Fake narrative : फेक नॅरेटीव्ह पसरवून भाजपचा रडीचा डाव

Fake narrative ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात झालेली विकास कामे ही राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांची फार मोठी जमेची बाजू आहे.

Fake narrative क्षेत्रातील तीनही तालुक्यात त्यांना मिळत असलेला जनआधार बघून विरोधीकांचे धाबे दनानले असल्याने पायाखालची जमीन सरकल्याचे निदर्शनास येताच विरोधकांनी आता अर्धवट व्हिडिओ क्लिपच्या साहाय्याने समाज माध्यमातून फेक नॅरेटीव्ह पसरवून रडीचा डाव सुरू केल्याचे माजी नगराध्यक्ष स्वप्निल कावळे यांनी म्हटले आहे.

चंद्रपुरात वाळू तस्करावर महसूल प्रशासनाची कारवाई

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राच्या इतिहासात राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ना भूतो न भविष्यती असा अभूतपूर्व विकास केला. यासोबतच त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रुग्ण सेवा,  50 हजाराहून अधिक नागरीकांना मोफत चष्मे वाटप, शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या शिक्षण मार्गावरील अडचणी दूर करणे, हलाखीची आर्थिक परिस्थिती असलेले रुग्ण, सामान्य नागरिक, यांना वेळोवेळी मदत करणे, कॅन्सर सारख्या महाभयंकर जीवघेण्या रोगाचे निदान करण्यासाठी विजयकिरण या फाउंडेशनच्या मार्फतीने अद्यावत यंत्र सहित तयार केलेली व्हॅन कार्यान्वित करून वेळीच रोगाचा अंदाज बांधणे व कर्करोगग्रस्तांना विनामूल्य तातडीने शस्त्रक्रियेसाठी नेऊन हजारो लोकांचे प्राण वाचविले. Fake narrative

चंद्रपुरात प्रतिबंधित तंबाखू वर कारवाई

अशा सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या जनसेवका विरोधात निवडणुकीतील राजकीय विरोधकांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा वाढता जनाधार व त्यांना मिळणारे जनतेचे ,समर्थन, प्रेम आणि बळ यावर निरूत्तर होऊन बघायच्या भूमिके शिवाय  कुठलाही अन्य पर्याय उरत नसल्याने निवडणुकीत आपली पत राखण्यासाठी आता विरोधीकांनी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या कार्यकर्ता बैठकीतील संवादाची व्हिडिओ क्लिप अर्धवट टाकून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे.

बल्लारपूर मतदारसंघात चहाच्या केटलीने वातावरण तापलं

राज्याच्या संविधानिक महत्त्वपूर्ण अशा जबाबदारी असलेल्या पदावर विराजमान होऊनही आपले पाय जमिनीवर ठेवून सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे जनसामान्याच्या समस्यांना पोटतिडकीने सोडवून अहोरात्र मेहनत घेणाऱ्या व क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचेवर टीकेची गरड ओकणे म्हणजे आभाळावर थुंकण्यासारखे होय. असे सिंदेवाहीचे माजी नगराध्यक्ष स्वप्निल कावळे यांनी म्हटले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!