gondwana university exam time table : सिनेट सदस्य बेलखडे यांच्या मेल नंतर परीक्षा वेळापत्रकात बदल

gondwana university exam time table

gondwana university exam time table चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुकर व्हावे यासाठी गडचिरोली जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती.

या विद्यापीठाचा उद्देश काही पूर्ण होताना दिसत नसून अनेक वादग्रस्त निर्णय या विद्यापीठाच्या माध्यमातून होत असल्याने विद्यार्थी सुद्धा विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे चांगलेच त्रासून गेले आहे.

86 हजारांची कायमस्वरूपी नोकरी हवी तर आजच करा अर्ज

असाच एक निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर शैक्षणिक अभ्यासक्रम बाबत नुकसानीची वेळ येणार होती मात्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांच्या गंभीर दखलते मुळे विद्यापीठाला निर्णय बदलावा लागला.

गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत हिवाळी परीक्षेचा हंगाम सुरू आहे, विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या काळात विद्यापीठाने परीक्षेच्या तारखा घोषित केल्या, यामध्ये काही पेपरच्या वेळापत्रकात ऐनवेळी बदल करण्यात आला होता.

परीक्षेच्या या हंगामात B. ed च्या परीक्षा सुरू आहे, त्याबाबत वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते, 14 व 15 डिसेंबर रोजी बीएड व केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या CTET अभ्यासक्रमाच्या परीक्षा पेपर एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना एकाच दिवशी 2 पेपर देणे शक्य नव्हते. कारण असंख्य विद्यार्थी सदर परीक्षा देण्यासाठी बाहेर गावातून येणार होते. gondwana university exam time table

केंद्रीय शिक्षण विभागाच्या संपूर्ण देशात एकाच दिवशी CTET च्या परीक्षा घेतल्या जातात असे असतानाही गोंडवाना विद्यापीठाने बीएड अभयसक्रमाच्या परीक्षा त्या दिवशी घेतल्याने विद्यार्थी वर्गात चांगलाच गोंधळ उडाला होता, याबाबत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे सिनेट सदस्य निलेश बेलखडे यांच्याकडे तक्रार देत मदतीची विनंती केली.

विद्यापीठाचा गलथान कारभार सिनेट सदस्य बेलखडे यांना लक्षात आल्यावर त्यांनी विद्यापीठाला जाब विचारला, आपण अश्या चूका वारंवार का करीत आहोत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करीत विद्यापीठाला मेल करीत बीएड अभ्यासक्रमाच्या परीक्षा वेळापत्रकात तात्काळ बदल करावा हो मागणी केली. gondwana university exam time table

निलेश बेलखडे यांच्या मेल नंतर आपला निर्णय चुकला ही बाब विद्यापीठाच्या लक्षात आली त्यांनी तात्काळ परीक्षा वेळापत्रकात बदल करीत 15 डिसेंबर रोजी बीएड अभ्यासक्रमाचा पेपर आता 18 डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे परिपत्रक काढले.

बेलखडे यांच्या तत्परतेने दोन्ही परीक्षा देण्यासाठी बाहेर गावावरून येणारे व स्थानिक विद्यार्थ्यांनी सिनेट सदस्य निलेश बेलखडे यांचे आभार मानले आहे.

गलथान कारभार

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!