human and wildlife conflict : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, वर्षातील 27 वा बळी

human and wildlife conflict

Human and wildlife conflict सावली – सावली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्रातील सामदा बुज वन बीटातील निलंसनी पेठगाव येथिल रहिवासी रेखाबाई मारोती येरमलवार वय ५५ वर्षे या महिलेला वाघाने ठार केल्याची घटना आज दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.


वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील या वर्षातील हा 27 वा बळी आहे, यामध्ये 25 वाघ, 1 बिबट व एक रान डुक्कर च्या हल्ल्याचा समावेश आहे.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार मृतक रेखाबाई मारोती येरमलवार या दि. २९ नोव्हेंबर रोजी झाडण्या कापण्यासाठी निलंसनी पेठगाव ला लागुन असलेल्या वैनगंगा नदीकाठावरील जंगलात गेली होती. नदीला लागुन असलेल्या नाल्याजवळ झाडण्या कापत असताना दबाधरून असलेल्या वाघाने तिच्यावर अचानक हल्ला केला. Human and wildlife conflict

86 हजारांची नोकरी हवी तर आजच अर्ज करा, 800 जागांची बंपर भरती

या हल्ल्यात रेखाबाई जागीच ठार झाली. सायंकाळ झाली तरी रेखाबाई घरी आली नाही म्हणून मुलगा महादेव येरमलवार, राकेश येरमलवार व गावकऱ्यांनी रात्री जंगल व गाव परीसरात शोध घेतला मात्र रेखाबाई कुठेही मिळाली नाही. Human and wildlife conflict

या बाबत वनविभागाला माहिती देण्यात आली, माहिती प्राप्त झाल्यावर सामदा वन बीटाचे वनरक्षक यांचे स्थानिक पी आर टी चे कार्यकर्ते आकाश चुदरी, छगन बोरकुटे, प्रफुल्ल गेडाम, इंदारशाह पेंदाम, मंगेश कांबळे यांनी वनविभागाच्या सूचनेनुसार गावांशेजारी गस्त घातली.

दरम्यान रात्रीच्या सुमारास एक वाघ गावातील जिल्हा परिषद शाळेला लागुन असलेल्या बालाजी कात्तलवार यांचे घराशेजारी आल्याचे दिसल्याने पी आर टी च्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यास हाकलून लावले.

आज सकाळी वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक परमेश्वर खेडकर , वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे , क्षेत्र सहाय्यक आर. एम. सूर्यवंशी, बिट वनरक्षक बी. के. सोनेकर, आर. एस. डांगे आणि गावकऱ्यांनी शोध घेतला असता रेखाबाई ही मृत अवस्थेत वैनगंगा नदीकाठावरील जंगलात आढळून आली.

मृत महिलेचे प्रेत वनविभागाने पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले आणि कुटुंबास तात्काळ २५ हजार रुपयांची मदत दिली. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निलंसनी पेठगाव हे नदीकाठावर असल्याने या परिसरात नेहमीच वाघाचा संचार असतो त्यामुळे वनविभागाने गावाबाहेर सौर ऊर्जेचे दिवे लावावे अशी मागणी केली जात आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!