Illegal sand smuggling चंद्रपूर जिल्ह्यात वाळू घाटाचे अद्याप लिलाव न झाल्याने रेती माफिया सतत अवैधरित्या वाळूचा उपसा करीत प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची चोरी करीत आहे.
बल्लारपूर मतदारसंघात केटलीने वाढविले टेन्शन
Illegal sand smuggling चंद्रपूर जिल्ह्यातील पोम्भूर्णा, चिचपल्ली, सावली, घुग्गुस, पडोली, भद्रावती, तिरवंजा, छोटा नागपूर, पठाणपुरा गेट बाहेरील जमनजट्टी या ठिकाणी वाळू माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे.
निवडणुकीची आचारसंहिता लागल्यावर सुद्धा वाळू माफियाने हैदोस माजविला मात्र घुग्गुस मध्ये नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार यांनी वाळू माफियावर 7 नोव्हेंबर ला मध्यरात्री धडक कारवाई करीत 5 ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई केली.
सुगंधित तंबाखु तस्करी महिलेला अटक
घुग्गुस येथील वर्धा नदीच्या चिंचोली घाट परिसरात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती.
माहितीच्या आधारे महसूल प्रशासनातील नायब तहसीलदार गादेवार यांच्या पथकाने चिंचोली घाटावर धडक देत 5 ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई केली. Illegal sand smuggling
यामध्ये ट्रॅक्टर क्रमांक Mh34 ap 2264, mh L 7066, Mh34 AL 1685, Mh34 L 9542 व चेसिस क्रमांक NKTH00969 या वाहनाचा समावेश आहे. रेतीची अवैध वाहतूक करण्याऱ्या या वाहनावर कारवाई करीत 6.5 लाखांचा दंड वसूल करण्यात येईल अशी माहिती नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार यांनी दिली.
ही यशस्वी कारवाई तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे, तलाठी नवनाथ गोडघासे, श्याम खरात व अनुप वगारे यांनी केली.