Kishor Jorgewar live आमदार किशोर जोरगेवार यांच्या दणदणीत विजयानंतर तहसील कार्यालयातून भव्य विजय रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिकांना अभिवादन करत आमदार जोरगेवार गांधी चौकात पोहोचले.
Kishor Jorgewar live यावेळी जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्या वरती फुलांचा वर्षाव करण्यात आला, तर क्रेनच्या माध्यमातून भव्य हार घालून कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

चंद्रपूर जिल्ह्यात अपक्ष उमेदवारांनी गाजवलं निवडणुकीचे मैदान
आमदार जोरगेवार यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी वॉर्डागणिक फटाके फोडून जल्लोष केला. संध्याकाळी सात वाजता तहसील कार्यालयातून सजवलेल्या खुल्या गाडीतून भव्य रॅली काढण्यात आली.
जटपूरा गेट मार्गे गांधी चौकापर्यंत गेलेल्या या रॅलीत नागरिक, विविध संघटना, संस्था व मंडळांच्या वतीने पुष्पहार घालून आमदार किशोर जोरगेवार यांना विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अनेक ठिकाणी जेसीबीने फुलांचा वर्षाव करत आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वागत करण्यात आले. Kishor Jorgewar live
50 वर्षांत न झालेली कामे पाच वर्षांत पूर्ण केली; हा विकासपर्व असाच सुरू राहील
रॅली गांधी चौकात पोहोचताच तिचे रूपांतर भव्य सभेत झाले. सभेला संबोधित करताना आमदार जोरगेवार म्हणाले की, “मागील पाच वर्षांत मतदारसंघाच्या सर्वसमावेशक विकासावर भर दिला.

अपक्ष असतानाही चार उड्डाणपूल, धानोरा बॅरेजसारखी पाण्याच्या प्रश्नावर उपाययोजना, महाकाली मंदिर परिसरासाठी कोट्यवधींचा निधी, वढा तीर्थक्षेत्रासाठी २५ कोटी रुपये, दीक्षाभूमीसाठी ५७ कोटी रुपये, टायगर सफारीसारखी महत्त्वाची कामे आपण पाच वर्षात केली.
चंद्रपुरात सुरू झालेला विकासपर्व पक्षाच्या साथीत आणखी गतीशील करणार करू असे ते यावेळी म्हणाले.
आमदार जोरगेवार पुढे म्हणाले की, “मागील ३० दिवस संघर्षमय होते. मातोश्री अम्मा यांचे निधन झाले, मात्र चंद्रपूरकरांच्या स्नेहाने मला धीर दिला. Kishor Jorgewar live
भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जो विश्वास ठेवला, त्याला चंद्रपूरच्या जनतेने पाठिंबा दिला. सलग दुसऱ्यांदा निवडून देऊन सर्वसामान्य कुटुंबातील एका मुलाला मोठं केलं आहे. या उपकारांची परतफेड होणार नाही, पण तुमच्या प्रत्येक दु:खात मी मोठ्या भावाप्रमाणे उभा राहीन.”
चंद्रपूरच्या विकासाबाबत नागरिकांच्या सूचनांचा सन्मान राखत समान न्याय व सर्वसमावेशक विकासाचे धोरण राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, “पर्यटन विकास हे चंद्रपूरच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे.
ताडोबासोबतच चंद्रपूरच्या ऐतिहासिक, धार्मिक वारशाचा प्रचार-प्रसार करणे आवश्यक आहे,” असे सांगून त्यांनी पर्यटन वाढीच्या दृष्टीने प्रयत्नांची ग्वाही दिली. सभा मंचावरून जनसमुदाया पुढे नतमस्तक आमदार जोरगेवार यांनी नागरिकांचे आभार मानले. या प्रसंगी हजारो नागरिकांची उपस्थिती होती.