kishor jorgewar pathimba : या पाठिंब्यामुळे जोरगेवार यांची ताकद वाढली

kishor jorgewar pathimba क्रांतीवीर शहीद पुलेश्वर शेडमाके आदिवासी समितीने महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

kishor jorgewar pathimba यावेळी क्रांतीवीर शहीद पुलेश्वर शेडमाके आदिवासी समितीच्या अध्यक्ष शशिकला उईके, उपाध्यक्ष राधाबाई शिडाम, सचिव माला पेंदाम, कोषाध्यक्ष श्याम गेडाम यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात तुफान हाणामारी


आमदार किशोर जोरगेवार यांना विविध सामाजिक संघटना आणि समाजांचा जाहीर पाठिंबा मिळत असून, या पाठिंब्यामुळे त्यांची बाजू अधिक भक्कम होत असल्याचे दिसून येत आहे.

यापूर्वी सोनार हितकारिणी सभा, व्हॉइस ऑफ छत्रपती टायगर संस्था, एरंडेल तेली समाज, भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी, राष्ट्रीय मानवाधिकार पर्यावरण सुरक्षा व भ्रष्टाचार निवारण संघटन, महाराष्ट्र ए.टी. वर्कर्स युनियन, जय विदर्भ संघटना, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटना, बहुजन युथ क्रांती मोर्चा यांच्यासह विविध संघटनांनी आमदार किशोर जोरगेवार यांना समर्थन दिले आहे. kishor jorgewar pathimba


“आपल्या सर्वांच्या समर्थनाने आमची ताकद वाढली आहे. आपण दाखवलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. सर्व समाजाचा सर्वसमावेशक विकास हा आपला संकल्प आहे. या विकासाच्या पर्वात आपणही सहभागी होत आहात. समर्थन दिले आहे म्हणजे आपण विकासालाच पाठिंबा दिला आहे.

आपल्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या कामाला आमचे प्राधान्य असेल,” असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!