Breaking News : बल्लारपूर विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा नाट्यमय घडामोडी

Breaking News बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडत आहे, 2 राष्ट्रीय पक्षाना अपक्ष महिला उमेदवार डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी चांगलाच घाम फोडला आहे.

Breaking News अपक्ष उमेदवार म्हणून गावतुरे यांनी अर्ज भरला, मात्र त्यांचा या लढतीमध्ये टिकाव लागणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता मात्र गावतुरे यांच्या प्रचारात मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळाल्याने आता निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची चंद्रपुरात जाहीर सभा


स्वातंत्र्याची 75 वर्षे उलटून गेली तरीही आदिवासींच्या जीवनमानात काहीही बदल घडून आलेला नाही.प्रस्थापित राजकीय पार्ट्याने केवळ आदिवासि मतांचा वापरच केला आहे. त्यामुळे आता आदिवासी समाजाला निर्णय घेण्याची वेळ आली आहे. Breaking news

जल,जंगल,जमीन व आदिवासी संस्कृती प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रीय गोंडवाना पार्टी ही कटिबद्ध असून आदिवासींच्या न्याय हक्कासाठीच या पार्टीची स्थापना करण्यात आली आहे.

अपक्ष महिला उमेदवारांचे बॅनर फाडले


डॉ. अभिलाषाताई गावतुरे या नेहमीच आदिवासी समाजाच्या हाकेला धावून आल्या आहेत. आदिवासी समाजामध्ये जाऊन वैद्यकीय सेवा देणे,वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना किंवा मृत पावलेल्यांना नुकसान भरपाई मिळावी, कसत असलेल्या वनजमिनीचे पट्टे मिळावे, आदिवासी बहुल भागात पेसा कायदा लागू करावा यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. Breaking news


त्यामुळे आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी व आदिवासी समाजाचा आवाज विधानसभेमध्ये बुलंद करण्यासाठी डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांच्या पाठीशी आदिवासी समाजाने भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन राष्ट्रीय गोंडवाना पार्टी चे प्रदेश अध्यक्ष राकेश राजू भलावी,प्रदेश सचिव कमलेश नैताम, युवा प्रदेशाध्यक्ष प्रशील कोडापे यांनी केले आहे. Breaking news

samarthan patra

मुनगंटीवारांना पाठिंबा नाही – बापूजी गणपत मडावी, जिल्हाध्यक्ष, गोंडवाना गणतंत्र पार्टी

गोंडवाना गणतंत्र पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष जगन येलके हे आदिवासी समाजाची दिशाभूल करत असून मुनगंटीवार यांना पाठिंबा असल्याचे खोटे पसरवत आहेत. जगन येलके यांची पार्टीने हकालपट्टी केलेली असून त्यांचा गोंडवाना गणतंत्र पार्टीशी काहीही संबंध नाही.

पोंभुर्णा तालुक्यात आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे समाजाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जगन येलके यांना हाताशी घेऊन गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या नावाचा गैरवापर करून जे घाणेरडे राजकारण करण्यात येत आहे ते अत्यंत चुकीचे आहे. गोंडवाना गणतंत्र पार्टीचा मुनगंटीवार यांना पाठिंबा नाही. त्यामुळे पसरविण्यात येणाऱ्या खोट्या बातम्यांना, भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूजी मडावी यांनी केले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!