Local Crime Branch : चंद्रपुरातील “खंजर’ भाई जवळ मिळाली बंदूक

Local Crime Branch राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रशासन निवडणुकीच्या कामाला लागले असून पोलीस प्रशासन सुद्धा गुन्हेगारी वृत्ती ठेचण्याच्या मोहिमेत अग्रेसर दिसत आहे.

राजकीय : कार्यकर्त्यांनी केला निर्धार, अब की बार किशोर जोरगेवार

Local Crime Branch आदर्श आचारसंहितेच्या काळात स्थानिक गुन्हे शाखा अवैध धंद्यावर कारवाई सत्र राबवित आहे, या सत्रा दरम्यान गुन्हे शाखेने ‘खंजर” भाई कडून बंदूक व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

22 वर्षांचा तरुण जो मजुरी करतो त्याच्याजवळ बंदूक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या तरुणाला शोधणे सुरू केले.

महाकाली कॉलरी प्रभागातील आनंद नगर येथे राहणाऱ्या 22 वर्षीय शुभम उर्फ खंजर भाई संजय वासेकर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने wcl area रेती बंकर, बाबा नगर बायपास येथे ताब्यात घेत त्याच्या जवळून गावठी देशी कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकूण 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी खंजर भाई वर आर्म ऍक्ट अंतर्गत विविध कलमांव्ये शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

happy Diwali ad

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!