mahagenco recruitment 2024 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड द्वारे महानिर्मिती मध्ये 800 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
mahagenco recruitment 2024 या पदांमध्ये तब्बल 800 तंत्रज्ञ 3 पदांची भरती होणार आहे. विशेष बाब म्हणजे सदर पदभरती प्रक्रियेत तांत्रिक कौशल्य म्हणजेच iti पास उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे.
भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात विस्तृत माहिती मिळणार आहे.
तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेम्बर 2024 आहे.
मतदानाचा सेल्फी काढला आणि नशीब पालटलं
उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्षे पूर्ण असावे, मागासवर्गीय उमेदवारासाठी 5 वर्षाची सवलत देण्यात आली आहे.
अर्ज करताना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 300 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. mahagenco recruitment 2024
लिखित परीक्षा व कौशल्य चाचणीद्वारे उमेदवारांची निवड केल्या जाणार आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://mahagenco.in ला क्लीक करीत career सेक्शन ला क्लिक करावे.

अनुसूचीत जातीसाठी 104 जागा, अनुसूचित जनजाती करीता 56 जागा, विमुक्त जाती 24, भज (ब) 20, भज (क ) 28, भज (ड ) 16, विमाप्र 16, इतर मागास प्रवर्ग 152 व आर्थिक दुर्बल घटक 80, एसईबीसी 80, खुला प्रवर्ग 224 अश्या एकूण 800 जागा विविध प्रवर्गासाठी राखीव आहे.
वेतनश्रेणी – 34,555-845-38780-1140-50180-1265-86865 रुपये.उमेदवार हा भारतीय नागरिक व त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.