nitin gadkari चंद्रपूर – बल्लारपूर व चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार व किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ 13 नोव्हेंबर 2024 ला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, विकासपुरूष ना. श्री. नितीन गडकरी यांची जाहीर सभा दुर्गापूर व घुग्गुस जिल्हा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
Nitin gadkari देशभर रस्ते आणि पुलांचे जाळे निर्माण करून पायाभूत सुविधांना उभारी देणारे केंद्रीय मंत्री विकासपुरूष ना. श्री. नितीन गडकरी दुर्गापूर येथिल कार्यक्रमाला 13 नोव्हेंबरला उपस्थित राहणार आहे.
शक्तीनगर दुर्गापूर येथे डब्ल्यूसीएल कॉलनीजवळील गणेश मैदानात सकाळी 11 वाजता तर दुपारी दीड वाजता घुग्घुस येथील बसस्थानकाजवळील लॉयड मेटल परिसरात ना. श्री. नितीन गडकरी नागरिकांशी संवाद साधतील.
क्रांतिभूमी चिमुरात राहुल गांधी यांची जाहीर सभा
भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार व किशोर जोरगेवार यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजीत केंद्रिय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या जाहीर सभेला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.