nivadnuk padyatra घुग्घूस येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी पदयात्रेतून प्रचार करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची प्रमुख उपस्थिती होती.
nivadnuk padyatra आमदार किशोर जोरगेवार यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आव्हाहन हंसराज अहिर यांनी घुग्घूस येथील नागरिकांना केले. यावेळी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
डॉ.अभिलाषा गावतुरे यांना बहुजन समाज पक्षाचा पाठिंबा
केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला असून, त्यांच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी प्रचार केला जात आहे. kishor jorgewar
पदयात्रा आणि बैठकींच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत आणि आमदार किशोर जोरगेवार यांना विजय मिळवून देण्याचे आवाहन करत आहेत.
दरम्यान, काल आमदार किशोर जोरगेवार आणि हंसराज अहिर यांनी घुग्घूस येथे पदयात्रा काढून प्रचार केला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि घुग्घूसवासियांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. kishor jorgewar
सायंकाळी सात वाजता घुग्घूस शहरातील टिळक नगर येथून या पदयात्रेला सुरुवात झाली. नंतर दसरा मैदान, जे.जे. आयटीआय, वराडे हॉस्पिटल, जामा मस्जिद, घुग्घूस पोलीस स्टेशन, एस.सी.सी. रोड, मिरची मार्केट, फटाका कॉर्नर, पंचशील चौक मार्गे ही पदयात्रा नगर परिषदेच्या जलव विभागापर्यंत पोहोचली. यावेळी घुग्घूसवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.