Party star campaigner विधानसभा निवडणुक अंतिम टप्प्यात पोहचली असून सर्व पक्षीय स्टार प्रचारक आपल्या उमेदवारांचा जोरात प्रचार करीत आहे.
कांग्रेस, भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे वरीष्ठ नेते आपल्या उमेदवारासाठी विधानसभा क्षेत्र पिंजून काढत आहे. Party star campaigner
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी सारखे दिग्गज नेते चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात सभा घेत आहे, तर चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात देशाचे गृहमंत्री अमित शाह 15 नोव्हेंबर रोजी प्रचार सभा घेत आहे.
या दिग्गज नेत्यांच्या सभेत नागरिकांना पाण्याची बॉटल नेण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे, चंद्रपूर पोलीस दलाने आदेश जारी करीत अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या दौऱ्या प्रसंगी नागरिक मोठ्या प्रमाणात दाखल होतात, त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी पोलिसांनी आदेश जारी केले असल्याचे म्हटले आहे.
सभे दरम्यान काही साहित्य नागरिकांनी सोबत बाळगल्यास त्या वस्तू फेकून मारल्या जाऊ शकतात त्यामुळे अश्या कसल्याही वस्तू नागरिकांनी सोबत आणू नये.
15 नोव्हेंबर व 16 नोव्हेंबर रोजी अमित शाह आणि राहुल गांधी यांच्या सभेत हा आदेश लागू राहणार अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिली आहे.