polling day महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 49.87 टक्के मतदान दुपारी 3 वाजेपर्यंत झाले असून यामध्ये सर्वाधिक चिमूर विधानसभा क्षेत्रात एकूण 57.79 टक्के मतदान झाले आहे.
60 लाखांची रोकड व भाजपचे प्रचार साहित्य जप्त
polling day विधानसभा क्षेत्रात सकाळपासून प्रमुख उमेदवारांनी मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला, संथगतीने सुरू झालेले मतदान दुपारी 3 वाजेपर्यंत संथगतीने सुरूच होते.
एकूण मतदान दुपारी 3 वाजेपर्यंत
Polling day बल्लारपूर विधानसभा क्षेत्र – 48.81 टक्के, ब्रह्मपुरी विधानसभा – 56.34 टक्के, चंद्रपूर विधानसभा – 41.44 टक्के, चिमूर विधानसभा – 57.79 टक्के, राजुरा विधानसभा क्षेत्र – 51.52 टक्के, वरोरा विधानसभा – 46.09 टक्के असे एकूण 49.87 टक्के सरासरी मतदानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात झाली आहे.

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावीत राज्यात मजबूत सरकार स्थापन होण्याचा विश्वास व्यक्त केला. Polling day

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकाळी सहकुटुंब मतदान केंद्रावर उपस्थित राहत मतदानाचा हक्क बजावला, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज सह कुटुंब ब्रम्हपुरी येथील देलनवाडी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. Polling day
लोकशाही व संविधान रक्षणाकरीता आपण सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा. असे त्यांनी सर्वांना आवाहन केले.
यावेळी त्यांच्या पत्नी किरणताई वडेट्टीवार, मुली रोशनी वडेट्टीवार, शिवानी वडेट्टीवार, देवयानी वडेट्टीवार उपस्थीत होत्या.

चंद्रपूर जिल्ह्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुलगा मानस धानोरकर सोबत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत आज सकाळी चंद्रपुरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील केंद्रावर जाऊन सपत्नीक मतदान केले.
या उत्सवात आपणही सहभागी होऊन मतदान अवश्य करावे, असे आवाहन आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी यावेळी केले.

आमदार किशोर जोरगेवार यांनी स्व. अम्माचा आर्शिवाद घेत सकाळी १० वाजता पटेल हायस्कूल येथील मतदान केंद्रावर जात सह परिवार मतदान केले. यावेळी त्यांच्या सोबत कल्याणी किशोर जोरगेवार, प्रशांत जोरगेवार, रंजना जोरगेवार, प्रसाद जोरगेवार, कोमल जोरगेवार, यांची उपस्थिती होती.