Pravin Kakade defeated : प्रवीण काकडे यांचा पराभव, खासदार धानोरकर यांची पहिली प्रतिक्रिया

Pravin Kakade defeated 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला, या निकालात महायुती ने जोरदार मुसंडी मारली, तर महाविकास आघाडीचे सत्तेचे स्वप्न भंगले.

Pravin Kakade defeated चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा पैकी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात विजय वडेट्टीवार यांनी कांग्रेस पक्षाची लाज राखली, तर आपल्या भावाला वरोरा विधानसभा क्षेत्रातून कांग्रेस पक्षाचे तिकीट खासदार बहीण प्रतिभा धानोरकर यांनी अनेकांचा विरोध पत्कारीत खेचून आणले मात्र प्रवीण काकडे यांचा पराभव झाला, इतकेच नव्हे निकालात काकडे हे तिसऱ्या स्थानी गेले.

चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व

जय पराजय हा राजकारणाचा एक भाग असून विधानसभा निवडणूकीत लोकसभा क्षेत्रातील जनतेने दिलेला कौल मान्य करीत असल्याच्या भावना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

राजकारणात अनेकदा काही चुका न कळत होत असतात. त्या चुका आमच्या हातुनही झाल्या आहेत. परंतु जय झाला तर माजयचं नाही आणि पराजय झाला तर लाजायचं नाही ही आमची वृत्ती असून मी एक खासदार म्हणून येणाऱ्या  साडेचार वर्षांच्या काळात जनेतच्या पाठीशी सदैव उभी राहील. Pravin Kakade defeated

लवकरच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून परभवाची समिक्षा करणार असून भविष्यात गाव, तालुका व जिल्हा पातळीवरील संघटन मजबुतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

जनतेतून निवडून आलेल्या सर्व आमदारांना शुभेच्छा देऊन जात, धर्म, पंत या पलिकडे जाऊन आपण आपल्या क्षेत्रातील विकासाचा पाया मजबुत करावा, अशी आशा बाळगून पुनःश्च एकदा मी माझ्या मतदारुपी माय-बापांचा धन्यवाद व्यक्त करत असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!