pravin kakade महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच बिगुल वाजल्यापासून राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात प्रचाराला सुरुवात झाली आहे.
pravin kakade वरोरा विधानसभा क्षेत्राला महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारावर बंडखोरीचे ग्रहण लागले असले तरी वरोरा विधानसभा क्षेत्रातील जनतेचा महाविकास आघाडीचे, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रविण काकडे यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
प्रामाणिक राजकारणाला विरोधक घाबरले
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रविण काकडे यांनी प्रचाराचा नारळ फोडला असून प्रचारादरम्यान आज दि. 07 नोव्हेंबर 2024 रोजी असंख्य युवकांनी कॉग्रेस पक्षावर तसेच खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रविण काकडे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात रितसर प्रवेश केला.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना प्रविण काकडे म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा धर्म निरपेक्ष पक्ष असून सर्व समावेशक आहे. तुम्ही माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही. कुठल्याही कठीण प्रसंगी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
चंद्रपुरातील अट्टल गुन्हेगाराला केले स्थानबद्ध
यावेळी मुकेश चांदेकर, दिपक चव्हाण, कपिल राऊत, मोसिन शेख यांसह अनेक युवकांनी प्रवेश घेतला. या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षात नविन ऊर्जा संचारणार आहे.