Rahul Gandhi Rally विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात आता स्टार प्रचारकांच्या एन्ट्रीने नवी चुरस निर्माण झाली आहे.
Rahul gandhi rally चंद्रपूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते भाजप खासदार रवि किशन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर कांग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक आता उमेदवारांच्या प्रचारार्थ रणांगणात उतरले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विरुद्ध मोहीम, तब्बल 300 गुन्हे दाखल
कांग्रेसचे कन्हैया कुमार नंतर आता कांग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांची चिमूर येथे जाहीर सभा होणार आहे.
16 नोव्हेंबर रोजी चिमूर तालुक्यातील नेरी रोड जवळ कांग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.
20 नोव्हेंबर मतदानाचा दिवस असून त्यापूर्वी कांग्रेस व भाजप पक्षाचे स्टार प्रचारक आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी दाखल होत आहे.
12 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चिमूर मध्ये सभा आयोजित करण्यात आली होती.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मार्गदर्शनात कांग्रेसवर जोरदार टीका केली आता त्या टीकेवर राहुल गांधी काय उत्तर देतात याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष असेल.
चिमूर विधानसभा क्षेत्रातील कांग्रेसचे उमेदवार सतीश वारजूरकर यावेळी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यांच्यासमोर भाजपचे बंटी भांगडिया विजयाची हॅट्रिक मारण्याच्या तयारीत आहे. त्यांच्या विजयी रथाला वारजूरकर यंदा जोरदार आव्हान देताना दिसत आहे.