ram nagar police : रामनगर पोलिसांचे अवैध धंद्यावर कारवाई सत्र

ram nagar police विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच पोलिसांचे अवैध धंद्याविरुद्ध कारवाई सत्र सुरू झाले, चंद्रपुर पोलीस दलातील रामनगर पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व अवैध रेती वाहतुकीवर कारवाई केली आहे.

ram nagar police 30 ऑक्टोबर रोजी रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवैध सुगंधित तंबाखू घेऊन जाणाऱ्या युवकाला अटक केली, एक युवक दुचाकी वाहनाने सुगंधित तंबाखू घेऊन जात असल्याची माहिती सहायक पोलीस देवाजी नरोटे यांना मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत बंगाली कॅम्प रोड येथे दुचाकी क्रमांक MH34 BU 8946 ला थांबवित त्याची झडती घेतली असता सदर वाहनात प्लॅस्टिक च्या चुंगडी मध्ये 18 हजार 760 रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व एकूण मुद्देमाल 88 हजार 760 सहित 21 वर्षीय अजय राजू झाडे रा. इंदिरानगर, पंचशील चौक याला अटक केली.

राजकीय : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात रडीचा खोटा डाव

आरोपी युवक अजय झाडे हा बाबूपेठ मार्गाने बंगाली कॅम्प कडे सुगंधित तंबाखूची वाहतूक करीत होता.

दुसऱ्या कारवाईत रामनगर पोलिसांनी 1 नोव्हेंबर ला गुन्हे शोध पथक गस्तीवर असताना बंगाली कॅम्प चौक ते सावरकर चौक मार्गे अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रक क्रमांक MH34 BG 2216 मधील चालक प्रवीण बाबुराव गुरनुले व नरेश विलास वाढई यांना ट्रक मध्ये असलेल्या रेती परवाना बाबत विचारले असता त्यांनी रेतीचा परवाना नसल्याचे सांगितले. ram nagar police

विशेष बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील एकही वाळू घाटाचा लिलाव झाला नसल्याने अधिकृतपणे वाळू घाट सुरू झालेले नाही, त्यामुळे रामनगर पोलिसांनी दोन्ही आरोपीस ताब्यात घेत 5 ब्रास रेती किंमत 30 हजार व हायवा ट्रक किंमत 25 लाख असा एकूण 25 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ram nagar police

happy Diwali ad

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक असिफ रजा शेख यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सपोनि देवाजी नरोटे, पोलीस कर्मचारी हिमांशू उगले, पेतरस सिडाम, शरद कुडे, सचिन गुरनुले, प्रशांत शेंदरे, आनंद खरात, लालू यादव, अमोल गिरडकर, हिरालाल गुप्ता, रविकुमार ढेंगळे, संदीप कामडी, पंकज ठोंबरे, मनीषा मोरे, ब्युलटी साखरे यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!