Rebel candidates : चंद्रपूर जिल्ह्यात बंडखोरांनी गाजविले निवडणुकीचे मैदान

Rebel candidates राज्यात संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची लाट आली, भाजपने विरोधकांना चारही मुंड्या चित केले, मात्र काही जागांवर भाजप उमेदवारांना नाकी नऊ आणणारे अपक्ष उमेदवार यांनी चांगलेच मैदान गाजविले.

Rebel candidates चंद्रपूर जिल्ह्यातील काही जागांवर पक्षातून बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढली काहींनी दिग्गजांना आवाहन दिले तर काही घराणेशाही विरोधात लढले, निवडणूक हरली तरी अपक्षांचं नाव मात्र मतदारांच्या चर्चेत राहिलं.

चंद्रपूर जिल्ह्यात 6 पैकी 5 जागेवर महायुती तर 1 जागा कांग्रेसच्या वाट्याला

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यापुढे कांग्रेसचे संतोष रावत व कांग्रेस पक्षातून बंडखोरी करीत निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना आवाहन देण्यासाठी उभे राहिलेल्या डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी शेवटपर्यंत लढत दिली. Rebel candidates

सातव्यांदा विधानसभा निवडणुकीत उतरलेले सुधीर मुनगंटीवार यांना 1 लाख 5 हजार 969 मते मिळाली तर कांग्रेसचे संतोषसिंह रावत यांना 79 हजार 984 मते तर अपक्ष उमेदवार डॉ.अभिलाषा गावतुरे यांना 20 हजार 935 मतांवर समाधान मानावे लागले. मुनगंटीवार यांनी 25 हजार 985 मतांनी विरोधकांचा पराभव केला. Rebel candidates

अभिलाषा गावतुरे

अभिलाषा गावतुरे यांनी कांग्रेस पक्षाची तिकीट मिळावी यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र पक्ष श्रेष्ठीने त्यांना उमेदवारी नाकारली, मात्र लढण्याची तयारी केल्यावर गावतुरे यांनी माघार न घेता उमेदवारी अर्ज दाखल केला. Rebel candidates

अनेक गावात प्रचार सभा घेतल्या नागरिकांचा प्रतिसाद त्यांना मिळाला, इतकेच नव्हे तर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात काही गावातील नागरिकांनी गावतुरे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या प्रचारासाठी सोशल मीडिया इन्फ्लुन्सर डॉली चायवाला सुद्धा आला, केटली निवडणुकीत जिंकणार असा निर्धार मनात ठेवत गावतुरे लढल्या. Rebel candidates

मात्र भाजपच्या सुनामीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, जर कांग्रेस पक्षातून गावतुरे यांना तिकीट मिळालं असत तर परिस्थिती काही और असती. इतरांप्रमाणे त्यांनी निवडणुकीतून माघार न घेता त्या खंबीरपणे लढल्या याची चर्चा सध्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात रंगली आहे.

वरोरा भद्रावती मतदार संघातील शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी उमेदवारी आपल्या पक्षाच्या वाट्याला मिळावी यासाठी अनेक प्रयत्न केले, विशेष म्हणजे त्यांना उबाठा गटाने AB फॉर्म सुद्धा दिला. पण ऐनवेळी कांग्रेस खासदार धानोरकर यांच्या हट्टापुढे वरोरा विधानसभा क्षेत्राची उमेदवारी त्यांच्या भावाला मिळाली.

मुकेश जीवतोडे

मुकेश जीवतोडे यांच्याकडून पक्षाने उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले मात्र आता माघार नाही असा मनात निर्धार करीत जीवतोडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला, भाजपचे करण देवतळे व कांग्रेसचे प्रवीण काकडे यांच्या पुढे मुकेश जीवतोडे निवडणुकीच्या रिंगणात उभा झाला.

करण देवतळे यांचे वडील आमदार व मंत्री होते त्यांचा वारसा घेत करण निवडणुक लढविण्यासाठी सज्ज झाला, तर दुसरीकडे खासदार धानोरकर यांचे सख्खे भाऊ प्रवीण काकडे यांची काडीमात्र क्षमता नसताना उमेदवारी आपल्या घरी रहावी यासाठी त्यांना निवडणुकीत उभे करण्यात आले.

दोघांच्या घराणेशाही विरुद्ध कसलाही राजकीय लेबल नसताना मुकेश जीवतोडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली, वरोरा विधानसभा क्षेत्रात डोअर तो डोअर त्यांनी प्रचार सुरू केला.

मतदारांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत होता, 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी सुरू झाली, यामध्ये कांग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेले तर जीवतोडे जिंकण्यासाठी धडपड करताना दिसत होते.

मतमोजणी पूर्ण झाल्यावर भाजप उमेदवार करन देवतळे यांना एकूण 65 हजार 170 मते तर अपक्ष मुकेश जीवतोडे यांना 49 हजार 720 मते मिळाली तर कांग्रेसचे प्रवीण काकडे यांना 25 हजार 48 मतांवर समाधान मानावे लागले. देवतळे यांनी विरोधी उमेदवारांचा 15 हजार 450 मतांनी पराभव केला.

जीवतोडे शेवटपर्यंत घराणेशाही विरुद्ध निवडणुकीत लढले याची चर्चा वरोरा विधानसभा क्षेत्रात चांगलीच रंगली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!