Exclusive sachin pilot : या इंजिनचा फक्त धुव्वा उडतो – सचिन पायलट

sachin pilot भद्रावती – महायुती सरकार च्या काळात भ्रष्टाचार फोफावला, केंद्र व महाराष्ट्र राज्यातील सरकारला हे डबल इंजिन सरकार म्हणून सांगतात पण डबल इंजिन सरकार कामाचे नसून फक्त धुव्वा उडविण्याचे काम करीत आहे म्हणून महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडी चे सरकार आणून महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन सचिन पायलट यांनी आज केले.

अपक्ष महिला उमेदवार यांच्या बॅनर वर फेकले शेण

Sachin pilot भद्रावती येथील स्वागत सेलिब्रेशन येथे आयोजित महाविकास आघाडीचे उमेदवार प्रविण काकडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राजस्थान चे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती.

सभेदरम्यान आपले मत व्यक्त करताना सचिन पायलट म्हणाले कि, महाराष्ट्र हा देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारे राज्य असून या ठिकाणी धर्म निरपेक्ष सरकार म्हणून महाविकास आघाडीतील प्रत्येक उमेदवाराला निवडणून आणणे हे आपली जबाबदरी आहे.

वरोरा विधानसभेतील उमेदवार प्रवीण काकडे हे जनसामान्यांचे नेतृत्त्व करणारे उमेदवार म्हणून आपल्या समोर आहे. विकासातील सातत्य व भविष्यातील विधानसभा क्षेत्राच्या विकासाकरीता महाविकास आघाडीने आपल्या समोर योग्य उमेदवारी दिली आहे. तरी आपण यांच्या पाठाशी राहून या विधानसभेत पुन्हा एकदा विक्रम घडवावा असे आवाहन यावेळी सचिन पायलट यांनी केले आहे. Sachin pilot

महायुती सरकार च्या काळात महिलांवर होणारे अन्याय अत्याचार वाढले असून भ्रष्टाचार देखील फोपावला आहे. राज्यातील अनेक उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहे. शेतकऱ्यासाठी 3 काळे कायदे केंद्र सरकारने आणले होते त्याविरोधात हजारो शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले होते. त्या आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर केंद्र सरकारला काळे कायदे परत घ्यावे लागले होते, केंद्र व राज्य सरकारचे डबल इंजिन फक्त धुव्वा फेकण्याचे काम करीत आहे.

राज्यातील विकासाचे ध्येय ठेवून कार्य करणाऱ्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान करुन सत्ता परिर्वनाच्या लढाईत आपला सहभाग नोंदवावा, असे मत देखील यावेळी सचिन पायलट यांनी केले. यावेळी मंचावर खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, यांसह महाविकास आघाडीचे अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!