Sambhaji Brigade : भूषण फुसे यांच्या नेतृत्वात असंख्य नागरिकांचा संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश

Sambhaji Brigadeभूषण फुसे यांच्या नेतृत्वावर विश्वास वाढला, गडचांदूरात शेकडो युवक, पुरुष व महिलांचा संभाजी ब्रिगेड पक्षा मध्ये प्रवेश


Sambhaji Brigade गडचांदूर – कोरपना तालुक्यात संभाजी ब्रिगेडमध्ये युवक, पुरुष व महिलांचे इनकमिंग सुरू झाले असून सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गडचांदूरात शेकडो युवक, पुरुष व महिलांचा संभाजी ब्रिगेड पक्षा मध्ये प्रवेश केला.

गुन्हेगारी : चंद्रपुरातील खंजर भाई कडे मिळाली बंदूक

शिवश्री भूषण मधुकरराव फुसे यांनी दुपट्टा टाकत सर्वांचे स्वागत केले. कोरपना तालुक्यातील चेन्नई खुर्द येथील मनसे उपाध्यक्ष दशरथ गेडाम, जांभुळदरा येथील कोरपना तालुका सोसायटी अध्यक्ष चंदुलाल शेडमाके यांनी सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश केला.

गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्र पिंजून काढत जनसंपर्क वाढविला आहे. डिस्को डांस, लावणी, डिस्को दांडिया, ठुमका, झुमका, नट्या, पार्ट्या अश्या कार्यक्रमांना बगल देत भूषण फुसे यांनी सामाजिक चळवळीतून प्रा. लक्ष्मण यादव. प्रा. वसंत हंकारे, भक्तिमय माता जगराता, कोणतीही गाजावाजा न करता गरजवंतांना वेळोवेळी सहाय्य्य, गोर, गरीब कष्टाळू लोकांचे कामे न करणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना तंबी, वेळ प्रसंगी दे दणका अश्या कामांना बघत शोषित-वंचित लोकांचा मोठा वर्ग भूषण फुसे यांच्या कडे आकृष्टल्या जात आहे. त्याचीच हि परिणीती असून गडचांदूरात शेकडो युवक, पुरुष व महिलांचा संभाजी ब्रिगेड पक्षा मध्ये प्रवेश घेतला.

happy Diwali ad

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!