Today samvidhan divas : SNDT महाविद्यालयात संविधान दिवस साजरा

samvidhan divas एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या महार्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर कॅम्पसमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

samvidhan divas कार्यक्रमाची सुरुवात कॅम्पस संचालक डॉ. राजेश इंगोले यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

कॅम्पसचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले, की  “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आपल्याला समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांसारख्या मूलभूत मूल्यांची शिकवण देते. ते फक्त पुस्तकात राहू नये, तर आपल्या कृतींमध्ये उतरले पाहिजे.” samvidhan divas


कार्यक्रमादरम्यान संविधान वाचन आणि प्रतिज्ञा घेण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या ( कार्यक्रम अधिकारी प्रा. खुशबू जोसेफ यांनी संविधान वाचन केले आणि संविधानाच्या महत्त्वावर भाष्य केले. त्या म्हणाल्या, “भारतीय संविधान केवळ कायद्याचा दस्तऐवज नसून ते आपल्या राष्ट्राची ओळख आहे. त्याचा सन्मान राखणे आपले कर्तव्य आहे.”

पालकत्व मिळण्याची सुवर्णसंधी


सहाय्यक कुलसचिव  डॉ. बाळू राठोड यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगत संविधान हे भारतीय समाजाच्या एकात्मतेचे प्रतीक असल्याचे अधोरेखित केले.
समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांनी त्यांच्या भाषणात संविधानाच्या आदर्शांवर चालण्याचे आवाहन करत विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन केले.

Sanvidhan shapath
शपथ घेताना विद्यार्थिनी


कार्यक्रमात विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीनीनी  मोठ्या संख्येने सहभागी झाले. संविधान दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये भारतीय संविधानाबद्दल आदर आणि त्याचे महत्त्व रुजवले.कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत करण्यात आले.

चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात प्रवीण पडवेकर यांनी रचला इतिहास


संविधान दिनाच्या निमित्ताने महत्त्वपूर्ण मूल्ये आणि आदर्शांवर आधारित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना संविधानाची जाणीव करून देणारा ठरला.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!