Shivani Wadettiwar ब्रह्मपुरी – विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला असून सर्व राजकीय पक्षाचे शिलेदार प्रत्येक गावात मते मागताना फिरत आहे.
Shivani Wadettiwar ब्रह्मपुरी मतदारसंघात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहे यावेळी त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मुनगंटीवार यांनी दिला महाविकास आघाडीला धक्का
शिवानी वडेट्टीवार प्रचार करीत असताना गावातील वीज गेल्याने त्या चक्क शिवीगाळीवर उतरल्या, त्यांनी भर भाषणात महावितरणच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. Shivani Wadettiwar
ब्रह्मपुरी तालुक्यातील आकापूर गावात सायंकाळी शिवानी वडेट्टीवार ह्या प्रचार करीत असताना अचानक वीज गेली, मोबाईल टॉर्च च्या प्रकाशात त्यांनी आपलं भाषण सुरू ठेवले मात्र त्यांचा संयम सुटला आणि महावितरण च्या अधिकाऱ्यांनी जाणून वीज बंद केला असा आरोप करीत त्या थेट शिवीगाळी करायला लागल्या, राज्याचा विरोधीपक्ष नेता हा पुढचा मुख्यमंत्री असतो हे लक्षात घ्या आमची सत्ता आली तर महावितरण व भाजपला चांगलाच धडा शिकविणार असे वक्तव्य शिवानी वडेट्टीवार यांनी यावेळी केले. Shivani Wadettiwar
कांग्रेसचे प्रवीण काकडे यांची उमेदवारी रद्द करा
शिवानी वडेट्टीवार यांच्या भाषणाचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने शिवानी वडेट्टीवार ह्या चांगल्या अडचणीत सापडल्या आहे, सदर व्हायरल व्हिडीओ वर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता काही प्रतिसाद मिळाला नाही.
राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार हे ब्रह्मपुरी मतदारसंघातून कांग्रेस पक्षाचे उमेदवार आहे, ब्रह्मपुरी मतदारसंघात ते तिसऱ्यांदा आपलं नशीब आजमवित आहे.
सध्या विजय वडेट्टीवार हे राज्याचे दौरे करीत असताना त्यांच्या मतदारसंघातील प्रचाराची धुरा त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी सांभाळली मात्र प्रचार करीत असताना त्यांचा संयम सुटला.
विशेष म्हणजे आकापूर गावात मागील 10 वर्षांपासून थ्री फेज लाईन ची मागणी गावकरी करीत आहे, मात्र मागणी पूर्ण झाली नाही, मागील 10 वर्षांपासून वडेट्टीवार हे ब्रह्मपुरी मतदार संघातील आमदार व राज्याचे विरोधीपक्ष नेते आहे हे विशेष.