Support of BSP : डॉ. गावतुरे यांना विधानसभेत पाठविणार, बसपाचा पाठिंबा

Support of BSP डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी ७२ बल्लारपूर विधानसभेमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्यापासून विविध सामाजिक संघटना विविध राजकीय पक्ष विविध पुरोगामी संघटना यांचा पाठिंबा रोज जाहीर होत आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी आणि निवडून येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.


Support of BSP EVM मशीन वरील अनु क्र. 8 वर त्यांचे बोध चिन्ह किटली आहे. बसपा ही एससी, एसटी ,ओबीसी व धार्मिक अल्पसंख्यांक यांच्या सर्वांगीण विकासावर काम करणारी पार्टी आहे. डॉ. अभिलाषा गावतुरे या स्वतः बहुजन ओबीसी आहेत.

केटलीच्या प्रचारासाठी डॉली चायवाला मैदानात

प्रस्थापित पक्षाचा अल्पसंख्याक उमेदवारा विरुद्ध बहुजन समाजाचा त्या उमेदवार आहेत. त्यांना विधानसभेत पाठवून बहुजन समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी बहुजन समाज पार्टी त्यांना जाहीर पाठिंबा घोषित करीत आहे.


आज देशात व राज्यामध्ये प्रतिगामी शक्तींनी हाहाकार माजवलेला आहे.भाजपा , कॉंग्रेस वाले ताई ची प्रतिमा मलीन करून पाहत आहे. हे आम्हास माहित आहे. डॉ. अभिलाषा ताई यांना मिळत असलेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहून त्यांची झोप उडाली आहे. या मुळे विरोधी पक्ष ताई विरुद्ध भाजपाला अप्रत्यक्षपणे मदत करत आहेत अश्या अफवा पसरवत आहे. मात्र जनतेला सत्य माहित आहे. Support of BSP

तेव्हा प्रस्थापित पक्षाचा अल्पसंख्याक उमेदवाराला हरविण्यासाठी व डॉ. अभिलाषाताई गावतुरे ह्यांना जिंकविण्यासाठी बहुजन समाज पार्टी च्या सर्व बूथ, सेक्टर, व विधानसभेतील पदाधिकारी ह्यांनी सहकार्य करावे असे आव्हान पक्षाद्रारे करण्यात येत आहे.


प्रेस क्लब वरोरा नाका चंद्रपूर येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बसपाचे जिल्हाध्यक्ष शिरीष कुमार गोगुलवार यांनी पक्षाचा पाठिंबा डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांना जाहीर केला. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये रत्नाकर साठे जिल्हा उपाध्यक्ष आणि संजय मेश्राम जिल्हा सचिव तसेच डॉक्टर राकेश गावतुरे हजर होते. Support of BSP


डॉ.अभिलाषा गावतुरे यांचे केवळ विधानसभा आणि जिल्ह्यामध्येच काम नाही, तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी बऱ्याच मंचावर काम केलेले आहे आणि त्यामध्ये बहुजन समाजामध्ये त्यांनी केलेली कामे आणि त्यांनी दिलेले योगदान सुद्धा अतुलनीय आहे त्यांचं सामाजिक,शैक्षणिक,वैद्यकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान हे जिल्ह्यामध्ये अतुलनीय आहे. Support of BSP

सामाजिक कार्यात त्यांनी कुठलेही जात पात धर्म लिंग पंथ प्रांत भाषा यांचा भेद न करता योगदान दिलेले आहे. अशा सक्षम बहुजन महिला ने बहुजन समाजाचे नेतृत्व विधानसभेमध्ये करावे. या विश्वासाने आम्ही समर्थन जाहीर करीत आहोत अशी प्रतिक्रिया गोगुलवार यांनी दिली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!