The tiger of Chandrapur चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात मोठ्या मताधिक्याने निवडून येत आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा चंद्रपूरचा गड मिळवून दिला आहे.
The tiger of Chandrapur आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाल घालून आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वागत व सत्कार केला.
चंद्रपुरात पुन्हा देशी कट्टा जप्त
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात आमदार किशोर जोरगेवार यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रवीण पडवेकर यांचा २२,००० हून अधिक मतांनी पराभव केला आहे.
आमदार जोरगेवार सलग दुसऱ्यांदा चंद्रपूर विधानसभेचे आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले आहेत. भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या चंद्रपूर मतदारसंघात मागील निवडणुकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. यंदा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत त्यांनी मोठ्या विजयाची नोंद केली. त्यामुळे चंद्रपूर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे बळ पुन्हा वाढले आहे. The tiger of Chandrapur
दरम्यान, आज मुंबईत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी आमदार जोरगेवार यांचा शाल घालून त्यांचा सत्कार केला. या वेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले, “पक्षाने दाखविलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही.
विशेष म्हणजे ज्यावेळी जोरगेवार उपमुख्यमंत्री फडणवीस भेटण्यासाठी गेले असता त्यांना बघून चंद्रपूरचा वाघ आला असे वक्तव्य फडणवीस यांनी केले. The tiger of Chandrapur
पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू. येणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकेल, यासाठी प्रयत्नशील राहीन. तसेच, चंद्रपूरातील विकासकामे मार्गी लावणार असल्याचे यावेळी ते म्हणाले आहे.