Total voting percentage चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले, ग्रामीण भागातील जनतेने यंदा लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येत सहभाग घेतला पण शहरी भागातील जनता निरुत्साही निघाली.
Total voting percentage जिल्ह्यात एकूण 71.27 टक्के मतदान झाले, असले तरी विधानसभा क्षेत्रात बाजी कोण मारणार हे अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी नागरिक गल्ली बोळात कोण जिंकून येणार याची चर्चा करताना दिसून येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात ईव्हीएम मशीनची तोडफोड
वर्ष 2019 च्या तुलनेत यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. वर्ष 2019 मध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात 51.42 टक्के, बल्लारपूर – 62.53, राजुरा – 71.02, ब्रह्मपुरी – 71.53, चिमूर – 75.01 तर वरोरा विधानसभा मतदारसंघात एकूण 62.68 टक्के मतदान झाले होते. Total voting percentage
वर्ष 2024 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर विधानसभा मतदार संघात 57.98 (6.50 टक्के वाढ), ब्रह्मपुरी – 80.54 (9 टक्के), बल्लारपूर – 69.70 (7 टक्के), चिमूर – 81.75 (6.74 टक्के), राजुरा 72.71 (1.50 टक्के), वरोरा मतदारसंघात 69.48 (7 टक्के) मतदानात वाढ झाली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांनी भरघोस मतदान केले तर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील नागरिक लोकशाहीच्या उत्सवात कमी प्रमाणात सहभागी झाले.
विजय कुणाचा?
राजुरा विधानसभा मतदारसंघात वामनराव चटप यांचे नाव आघाडीवर तर बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर – किशोर जोरगेवार, चिमूर – सतीश वारजूरकर, वरोरा – अपक्ष/भाजप, ब्रह्मपुरी मतदारसंघात विजय वडेट्टीवार यांचं नाव आघाडीवर आहे.