vidhan sabha winner : चंद्रपुर जिल्ह्यात या उमेदवाराने रचला इतिहास

vidhan sabha winner 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली, चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा पैकी भाजपने 5 जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले, विजय वडेट्टीवार यांनी कांग्रेसची जिल्ह्यात लाज राखत ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात विजय मिळविला.


vidhan sabha winner चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात भाजपचे किशोर जोरगेवार यांनी कांग्रेस उमेदवार प्रवीण पडवेकर यांचा 22 हजार 804 मतांनी पराभव केला, जोरगेवार यांना एकूण 1 लाख 6 हजार 841 मते मिळाली तर कांग्रेसचे पडवेकर यांना 84 हजार 47 मते मिळाली.

प्रवीण काकडे यांच्या पराभवानंतर खासदार धानोरकर यांची प्रतिक्रिया काय?


आधी भाजप, मग कांग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व पुन्हा भाजप प्रवास असा दलबदलू चा ठपका विरोधी पक्षाने लावल्यावर सुद्धा जोरगेवार यांच्या विरुद्ध कांग्रेस पक्षाने सक्षम उमेदवार दिला नाही. विशेष म्हणजे 200 युनिट चा मुद्दा ही कांग्रेस कॅच करू शकली नाही. vidhan sabha winner

Kishor jorgewar rally
किशोर जोरगेवार यांची विजयी रॅली

या निवडणुकीत भाजप चे ब्रिजभूषण पाझारे यांनी तिकीट न मिळाल्याने बंडखोरी केली, भाजपने निवडणुकीत अपक्ष उमेदवार पाझारे यांची छुपी मदत केली, हा बंड नाही उठाव म्हणत पाझारे यांनी रडगाणं केलं, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही, प्रचार दरम्यान सामान्य जनतेकडे न जाता त्यांनी भाजप पक्षातील पदाधिकारी यांच्याकडे जाणं पसंत केल्याने जनतेने त्यांना सपेशल नाकारले.


वर्ष 2019 च्या निवडणुकीत जोरगेवार हे अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेच्या रिंगणात होते त्यावेळी त्यांना 1 लाख 17 हजार 570 मते मिळाली होती, यंदा जोरगेवार यांची लीड कमी झाली. vidhan sabha winner

बल्लारपूर विधानसभा

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून सातव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कांग्रेसचे संतोष रावत यांचा 25 हजार 985 मतांनी पराभव केला.

Sudhir mungantiwar rally
सुधीर मुनगंटीवार यांची विजयी रॅली


मुनगंटीवार यांना 1 लाख 5 हजार 969 मते तर रावत यांना 79 हजार 984 मते मिळाली. 3 वेळा मुनगंटीवार हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले असले तरी त्यांनी सलग 7 वेळा विधानसभा निवडणूक जिंकत त्यांनी विदर्भात इतिहास रचला हे विशेष. vidhan sabha winner

राजुरा विधानसभा

राजुरा विधानसभा क्षेत्रात भाजपचे देवराव भोंगळे यांनी कांग्रेस आमदार व जिल्हा कांग्रेस अध्यक्ष सुभाष धोटे यांचा 3 हजार 54 मतांनी पराभव केला.
भोंगळे यांना 72 हजार 882 मते तर कांग्रेसचे सुभाष धोटे यांना 69 हजार 828 मते मिळाली.


भोंगळे हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष होते, ते मूळचे घुग्गुस शहरातील निवासी असून त्यांनी राजुरा विधानसभा निवडणुकीत सहभाग घेत विजय मिळविला, मतदानाच्या पूर्वी त्यांच्या कार्यकर्त्याच्या घरून 60 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. vidhan sabha winner

चिमूर विधानसभा

चिमूर विधानसभा क्षेत्रातून भाजपचे किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळविला.
भांगडीया यांना 1 लाख 16 हजार 495 मते तर कांग्रेसचे सतीश वारजूरकर यांना 1 लाख 6 हजार 642 मते मिळाली, भांगडीया यांनी 9 हजार 853 मतांनी वारजूरकर यांचा पराभव केला. vidhan sabha winner

भांगडीया यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सभा घेतली होती तर वारजूरकर यांच्यासाठी कांग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी सभा घेतली मात्र चिमूर क्षेत्रातील जनतेने गांधी यांना नाकारले.

वरोरा विधानसभा

वरोरा विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा भाजपचा आमदार निवडून आला, वरोरा विधानसभा मतदारसंघ हा कांग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदारसंघ होता, दिवंगत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेतून निवडणूक लढवीत वरोरा विधानसभा जिंकली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर कांग्रेस पक्षातून निवडून आल्या. vidhan sabha winner

आजारपणाने बाळू धानोरकर यांचं निधन झालं आणि खासदार पदी प्रतिभा धानोरकर निवडून आल्या, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात खासदार धानोरकर यांना 2 लाख 60 हजारांची आघाडी घेतली, वरोऱ्याची जागा कांग्रेसकडे व आपल्या घरी रहावी यासाठी धानोरकर यांनी पक्षातून अनेकांचा विरोध पत्कारीत सख्खा भाऊ प्रवीण काकडे यांना उमेदवारी दिली, मात्र जनतेने काकडे यांना नाकारले.


माजी मंत्री संजय देवतळे यांचे सुपुत्र करन देवतळे यांनी 15 हजार 450 मतांनी शिवसेना उबाठा चे बंडखोर अपक्ष उमेदवार मुकेश जीवतोडे यांचा पराभव केला.
देवतळे यांना 65 हजार 170 मते तर अपक्ष उमेदवार जीवतोडे यांना 49 हजार 720 मते व कांग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांना 25 हजार 48 मते घेत तिसरे स्थान मिळाले, या निवडणुकीत कांग्रेस पक्षाचा लाजिरवाणा पराभव झाला.

ब्रह्मपुरी विधानसभा

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात कांग्रेसचे दिग्गज नेते विजय वडेट्टीवार यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवीत कांग्रेस पक्षाची जिल्ह्यात लाज राखली.


विजय वडेट्टीवार यांना एकूण 1 लाख 12 हजार 377 मते मिळाली तर भाजपचे कृष्णा सहारे यांना 98 हजार 289 मते मिळाली, वडेट्टीवार यांनी सहारे यांचा 14 हजार 88 मतांनी पराभव केला.

Vijay wadettiwar rally
विजय वडेट्टीवार यांची विजयी रॅली

चंद्रपूर जिल्ह्यात 6 पैकी 5 जागा भाजपच्या वाट्याला तर 1 जागा कांग्रेस पक्षाला मिळाली, लोकसभा निवडणुकीनंतर कांग्रेस पक्ष अति आत्मविश्वासात होता, आपलं जिल्ह्यात वर्चस्व राहावं यासाठी मित्र पक्षांना त्यांनी एकही जागा दिली नाही.

6 पैकी 3 जागेवर क्षमता नसलेले उमेदवार उभे केले, विशेष म्हणजे जिल्ह्यात धानोरकर-वडेट्टीवार यांचा संघर्ष बघता अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळू शकली नाही.
भाजपने लोकसभा निवडणुकीत मिळालेला पराभवाची कारणे शोधली आणि त्यावर संघटन शक्तीच्या आधारावर मात केली.


राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बहिणीच्या मनात जागा मिळविली, ही योजना चंद्रपूर जिल्ह्यात गेमचेंजर ठरली.
कांग्रेसला त्यांचा आत्मविश्वास या निवडणुकीत घेऊन बुडाला तर भाजपने गनिमी कावा करीत निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध केले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!