Voting awareness : लोकशाहीचा किल्ला मजबूत करा, मतदान करा

Voting awareness एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ, मुंबईचे  महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपूर कॅम्पसच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत आज मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आले.

पॉवर स्टार पवन कल्याण यांचा चंद्रपुरात रोड शो

Voting awareness या उपक्रमाची सुरुवात बल्लारपूर बसस्थानक येथे पथनाट्य सादरीकरणाने झाली. कॅम्पसचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी बल्लारपूर बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक राकेश कांबळे यांचे स्वागत केले.

सुमारे २०० नागरिकांनी पथनाट्य पाहून मतदानाचे महत्त्व समजून घेतले आणि त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली.

 विद्यार्थिनींनी शहीद भगतसिंह वॉर्डमध्ये घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. सुमारे १००-१५० घरांमध्ये जाऊन त्यांनी मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले.

यादरम्यान नागरिकांकडून मतदानासाठी उत्स्फूर्त पाठिंबा व्यक्त करण्यात आला. याशिवाय, नागरिकांना त्यांचे मत बजावण्याचे अधिकार आणि त्याच्या महत्त्वाची जाणीव करून दिली. Sndt woman university

अभिलाषा गावतुरे यांना मिळाली बसपाची साथ

रेल्वे स्थानकावर पथनाट्य सादर करताना सुमारे २५०-३०० लोकांनी पथनाट्य पाहिले. याठिकाणी उपस्थित नागरिकांनी फक्त पथनाट्य पाहून प्रेरणा घेतली नाही, तर त्यांच्याकडून मतदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली. नागरिकांनी या प्रतिज्ञेमार्फत आपापले मतदानाचा हक्क न चुकवण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रम पोलिस निरीक्षक श्री. गाडे यांच्या देखरेखीखाली पार पडला. निवडणूक विभाग, तहसील कार्यालय बल्लारपूरचे श्री. सचिन उमरे आणि नीरज बेहेरे यांचाही या उपक्रमात महत्त्वाचा सहभाग होता. Sndt woman university

संपूर्ण कार्यक्रम कॅम्पसचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. सहाय्यक कुलसचिव डॉ. बाळू राठोड आणि समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांनी या उपक्रमाला विशेष प्रोत्साहन दिले.

पथनाट्याचे सादरीकरण सहाय्यक प्राध्यापिका अपेक्षा पिंपळे आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्रुतिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली झाले, तर कार्यक्रम अधिकारी खुशबू जोसेफ यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या या अभियानात विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतरांचे सहकार्य लाभले. Sndt woman university

या अभियानाद्वारे नागरिकांना मतदानाची जबाबदारी समजावून सांगण्यात आली आणि त्यांना त्यांच्या लोकशाही हक्काचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!