Voting selfie contest : मतदानाचा सेल्फी काढला आणि नशीबचं चमकलं

Voting selfie contest लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वीप उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

Voting selfie contest यात प्रामुख्याने मतदान केल्यानंतर सेल्फी अपलोड करण्याच्या स्पर्धेत 8080 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. लकी ड्रॉ द्वारे या स्पर्धेचा निकाल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे यांच्या उपस्थितीत आज (दि. 27) घोषित करण्यात आला.

चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाची निराशाजनक वाटचाल

लकी ड्रॉ द्वारे काढण्यात आलेल्या या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस (बुलेट मोटारसायकल) ब्रम्हपूरी तालुक्यातील शंकर धर्मा भर्रे यांना, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस (15 ग्रॅम सोन्याचे नाणे) सिंदेवाही तालुक्यातील सोनल श्यामराव गभने व तृतीय क्रमांकाचे बक्षीस (मोबाईल फोन) चिमुर तालुक्यातील गितेश मदनकर यांना घोषित करण्यात आले.

Chandrapur conteste
विजेत्यांची नावे जाहीर करताना जिल्हाधिकारी गौडा

जिल्ह्यातील मतदारांमध्ये मतदानाप्रती जनजागृती होऊन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वीप उपक्रमांतर्गत सायकल रॅली, निबंध स्पर्धा,  प्रश्नमंजुषा,  टॅगलाईन, रिल्स तयार करणे, सेल्फी अपलोड करणे इ. स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!