Wamanrao Chatap public meeting
Wamanrao Chatap public meeting जिवती: तालुक्यातील पट्ट्याचा प्रश्न, वादग्रस्त गावांच्या समस्या, शेतमालाचे रास्त भाव आणि बेरोजगारी असे अनेक प्रश्न जिवती तालुक्यात प्रलंबित आहे.
हातात तलवार घेऊन चंद्रपुरात दोघांचा उच्छाद
मतदारांनी सभागृहात पाठविले नसले तरी रस्त्यावरचा संघर्ष करत राहू आणि पराभवाची मरगळ झटकून पुन्हा जोमाने कामाला लागू असे प्रतिपादन ॲड. वामनराव चटप यांनी केले.भाजपचा पैशाचा आलेला महापूर निवडणुकीत रोखता आला नाही.
नाटक बघण्यासाठी तीन मित्र निघाले मात्र वाटेत काळाचा घाला, तिघांचा मृत्यू
गैरमार्गाने विजय खेचून आणला असला तरी ताठरपणे विरोध करून जनतेची लढाई समोर नेऊ. रचनात्मक पध्दतीने पुढे जाऊन आक्रमक आंदोलनात जनतेचे प्रश्न तडीस नेऊ असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी उपस्थित ॲड. दीपक चटप म्हणाले की, आता नव्या जोमाने संघटनात्मक बांधणी करु. सातत्य ठेवल्यास संधी मिळेल आणि उभारी घेऊ. Wamanrao Chatap public meeting

शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अरुण नवले यांनी निवडून आलेल्या उमेदवाराने जिवती तालुक्यातील जनतेला खोटी प्रलोभन भुलथापा देऊन मत हिरावले असे मत व्यक्त केले. स्वभाप जिल्हाध्यक्ष निळकंठ कोरांगे यांनी संघटनात्मक बांधणी करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करू. चुकांचे आत्मचिंतन करू.
86 हजार पगाराची नोकरी हवी तर आजच करा अर्ज
जिवती तालुक्यातील प्रश्न सोडविण्याचे सामर्थ्य ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात आहे. आगामी काळात कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करु असे मांडले. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. Wamanrao Chatap public meeting
ॲड. वामनराव चटप यांची साथ सोडणार नसल्याचे कार्यकर्त्यांनी मांडले. यावेळी सुदाम राठोड, दत्ता राठोड, नरसिंग हामने, शब्बीर जहागीरदार, सयासराव कुंडगिर, देवीदास वारे, श्रीनिवास वाघमारे, विनोद पवार, जैतू कोडापे, बालाजी कांबळे, गणेश कदम, मारोती कांगने, रामेश्वर नामपल्ले आदींची उपस्थिती होती.