Warora Assembly Constituency वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातील प्रचार अंतिम टप्प्यात असून अठरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. परंतु मुख्य लढत ही महावीकस आघाडी व महायुती यांच्यात होईल असे चित्र निर्माण होत आहे.
किशोर जोरगेवार यांच्या विजयी रॅलीत मी येणार – गृहमंत्री अमित शाह
Warora Assembly Constituency 2019 च्या विधानसभा निवडणूकीत देखील वरोरा विधानसभेत काही उमेदवारांनी बंडखोरी केली होती. परंतु वरोरा विधानसभेतील सुज्ञ मतदारांनी अपक्ष उमेदवारांना नाकारले होते.
या वर्षी होत असलेल्या निवडणूकीत देखील प्रत्येक उमेदवारांनी आपल्या विजयाचे गणित मांडायला सुरुवात केली असून, परंतु मुख्य लढत ही महाविकास आघाडीचे उमेदवार प्रविण काकडे व महायुतीचे उमेदवार करण देवतळे यांच्यात होणार असल्याचे चित्र निर्माण होत आहे.
डॉ.अभिलाषा गावतुरे यांना जाहीर पाठिंबा
दोन्ही उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहचला असून प्रत्येक मतदारांपर्यंत उमेदवार पोहचतांना दिसत आहे. वरोरा विधानसभेतील आजवरच्या इतिहासात अपक्ष उमेदवारांना जनता नाकरत असल्याचे प्रामुख्याने दिसून आले आहे. Warora Assembly Constituency
राजकारणातील घोडेबाजार टाळण्यासाठी वरोरा-भद्रावती विधानसभेतील जनता अपक्षांना साथ देणार नाही हे मतमोजणी च्या दिवशी दिसणार आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रविण काकडे यांनी मागील दहा वर्षांच्या विकास कामांवर मते मागत असून महायुतीचे उमेदवार विविध प्रचारांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत आहे. काही दिवसात या दोन राष्ट्रीय पक्षापैकी कोण प्रचारात आघाडी घेईल हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.