Warora Voters : कांग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांचा मतदारांशी थेट संवाद

Warora Voters विधानसभेतील प्रचार अंतिम टप्प्यात असून प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचून आपल्या योजना समजवुन सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.

Warora Voters महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण काकडे यांनी ग्रामीण भागातील मतदारांची संवाद साधून ग्रामीण भागातील विकासासाठी निवडून देण्याचे मतदारांना आवाहन केले आहे.

उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या रोड शो मध्ये उसळला जनसागर


मागील दहा वर्षाच्या काळात धानोरकर दांपत्यांनी वरोरा विधानसभेचा विकासाच्या माध्यमातून चेहरा बदलवीलेला आहे. येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात ग्रामीण भागातील विकासातील सातत्य व आणखी विकासात्मक योजना आणण्याकरिता आपण निवडून द्यावं असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण काकडे यांनी ग्रामीण भागातील प्रचारादरम्यान मतदारांना केले आहे.

आम्ही विकासावर मते मागतो अपप्रचार करून नाही असे मत देखील प्रवीण काकडे यांनी व्यक्त केले. अपक्ष उमेदवारांना मत देणे म्हणजे भ्रष्टाचाराला चालना देणे असे देखील मत प्रचारांना दरम्यान त्यांनी व्यक्त केले. Congress candidate

येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील नागरिकांची संवादातून माझी नाळ जुळून राहील व विकास करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन याकरिता आपण मला मतदान करावं असं मत देखील प्रवीण काकडे यांनी व्यक्त केले. वरोरा तालुक्यातील खांबाडा, टेंभुर्डा, नागरी, या ठिकाणी प्रवीण काकडे यांनी प्रचाराच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!