Guardian Minister chandrapur : कोण होणार चंद्रपूर जिल्ह्याचा पालकमंत्री?

Guardian Minister chandrapur महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप पक्ष वरचढ ठरला असून महायुती यंदा 200 पार झाल्याने दोन दिवसात राज्यात नवं सरकार स्थापन होण्याच्या हालचाली वाढल्या आहे.

Guardian Minister chandrapur मंत्रिपदासाठी अनेकांनी बाशिंग बांधले असून मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात या बंडखोरांची चर्चा

चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा निवडणुकीत सलग सात वेळा विजय मिळविला आहे, त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार हे निश्चित आहे.

सरकार स्थापणने नंतर सुधीर मुनगंटीवार यांचा शपथविधी होणार हे नक्की आहे, पण जिल्ह्याच्या राजकारणात भाजपातून विधानसभा निवडणुकीत हॅट्रिक मारलेले किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांना सुद्धा मंत्रिपद मिळणार अशी चर्चा आहे.

मंत्रिपद मिळाल्यावर चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री पदी कुणाची वर्णी लागणार? कोण होणार जिल्ह्याचा पालकमंत्री याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, भांगडीया सुद्धा पालकमंत्री पदासाठी आग्रही असू शकतात.

पक्ष श्रेष्ठीने ठरविल्यास जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळणार, मात्र सध्यातरी मुनगंटीवार हे जेष्ठ नेते असल्याने त्यांना पुन्हा ही जबाबदारी दिल्या जाऊ शकते. असे झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील 2 नेते मंत्रिमंडळात आपले स्थान पक्के करणार.

2 मंत्री असल्यावर जिल्हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर असणार हे विशेष.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!