Poshan Ahar : पोषण आहाराचा खेळखंडोबा, 106 विद्यार्थ्यांना विषबाधा

Poshan Ahar

Poshan Ahar 4 डिसेंबर रोजी सावली तालुक्यातील 106 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली, या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली, दुसऱ्या दिवशी सदर घटना उघडकीस आली मात्र मुख्यमंत्री यांचा शपथविधी असल्याने सदर घटनेबाबत वाच्यता फुटली नाही.

तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामधुन विषबाधा झाल्याची घटना गुरुवारला घडली. यात 106 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असुन सदर विद्यार्थ्यांना वेगवेगळया रुग्णालयात हलविण्यात आले आहे. Poshan Ahar

नझुल जमीन धारकांसाठी शासनाची विशेष अभय योजना

चंद्रपूरच्या रुग्णालयात 05, गडचिरोली च्या रुग्णालयात 20, सावली येथील ग्रामिण रुग्णालयात 19 विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. जागेअभावी मुल येथील रुग्णालयात 62 विद्यार्थ्यांना हलविण्यात आले आहे. शाळेतील उपस्थित 126 विद्यार्थ्यापैकी 106 रुग्णालयात तर 20 विद्यार्थ्यांवर गावातच उपचार सुरु असुन उकडलेल्या चण्याच्या नमुन्यासह बाधीत विद्यार्थ्यांचे हगवण, उलटी व लघवीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. Poshan Ahar

पारडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातुन विषबाधा झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात येत असले तरी प्रयोग शाळेतील येणाऱ्या अहवालानुसारच पुढील उपचार करण्यात येणार असल्याचे आरोग्य यंत्रणेकडुन सांगण्यात येत आहे.

ईव्हीएम विरोधात चंद्रपुरात आमरण उपोषण

4 डिसेंबर ला विद्यार्थ्यांना उकडलेले चणे तिखट, मीठ लावून देण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी 5 तारखेला विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनानंतर हगवण, उलटी यासारखी लक्षणे आढळून आल्याने विद्यार्थ्यांना सावलीच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. सर्वच विद्यार्थ्यांना सायंकाळी सहा वाजेपर्यंत अशी लक्षणे दिसु लागल्याने 106 विद्यार्थ्यांना भरती करण्यात आले. Food poisoning

कीड लागलेल्या धान्यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सावलीच्या ग्रामिण रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या विद्यार्थ्यावर आरोग्य यंत्रणेने वेळीच उपचार केल्याने सुदैवाने आतापर्यंत कोणतीही दुर्घटना झालेली नाही.

मध्यरात्रीपर्यंत चंद्रपूरचे जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे, वैद्यकीय अधिक्षक बंडू रामटेके, गटविकास अधिकारी मधुकर वासनिक, गटशिक्षणाधिकारी मोरेश्वर बोंढे उपस्थित होते. जिल्हयातील सर्व अधिकाऱ्यांनी पारडी गावात भेट दिली असुन दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नेमकं काय घडलं?

सावली तालुक्यातील पारडी गावातल्या जिल्हा परिषद शाळेची एकूण पटसंख्या 133 आहे, 4 डिसेंबर रोजी 126 विद्यार्थी शाळेत हजर होते यावेळी शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना उकळलेले चने तिखट मीठ लावून दिले, रात्रीच्या वेळेस विद्यार्थ्यांना हगवण व उलट्या सुरू झाल्या, तापाची साथ आहे असा मनात चंग बांधत पालकांनी दुर्लक्ष केले मात्र दुसऱ्या दिवशी विद्यार्थी शाळेत गेले आणि पुन्हा त्यांना उलट्या सुरू झाल्या, विद्यार्थ्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.पोषण आहारातील चना हा 2 महिन्यांपूर्वी शाळेत आला होता, त्यादिवसापासून तो तसाच पडून होता. Food poisoning

बाधीत विद्यार्थ्यांच्या हगवण, उलटी, लघवीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत. सध्या भरती असलेल्या विद्यार्थ्याची प्रकृती धोक्याबाहेर असुन प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

महादेव चिंचोळे, जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर

विद्यार्थ्यांची विचारपूस केली असता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, या प्रकरणी लवकर चौकशी समिती नेमत दोषींवर कारवाई करण्यात येईल.

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर विवेक जॉन्सन

या प्रकरणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती घेत विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करून द्यावे, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी याना आमदार मुनगंटीवार यांनी दिले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!