waghnakh
waghnakh : चंद्रपूर शहरातील लोहारा येथे 4 वाघनखे सहित 2 आरोपीना वनविभागाने 30 डिसेंबर रोजी अटक केली असून या प्रकरणी काही आरोपी पसार आहे.
जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यात असंख्य वाघ वास्तव्यास आहे मात्र काही वाघ हे जंगलाबाहेर आपला घरोबा करून आहे.
वर्ष 2024 मध्ये 20 वाघ तर 17 बिबट्याचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यामध्ये बरेचसे वाघ हे दोन वाघांच्या झुंजीत तर इतर वाघाचा मृत्यूचे कारण हे अस्पष्ट आहे.
वर्ष 2024 मध्ये वनविभागाने वाघाची शिकार (tiger hunting) करणाऱ्या टोळीला अटक केली होती, त्यानंतर वनविभाग अश्या शिकाऱ्यांवर नजर ठेवून होती.
खासदार धानोरकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहलं महत्वाच्या विषयावर पत्र
चंद्रपुरातील वनपरिक्षेत्र अधिकारी जी.आय.नायगामकर यांना वाघनखांच्या अवैध व्यापाऱ्यांची माहिती मिळाली होती, त्या आधारे 30 डिसेंम्बर रोजी सापळा रचत लोहारा येथील संदीप हरी तोडासे, शेखराम किसन तोडासे या दोघांना 4 वाघनखांसहित (waghnakh) अटक करण्यात आली.
सदर वाघनखे हे अवैध व्यापारासाठी आणल्याचे निष्पन्न झाले, आरोपीना अटक करीत त्यांना न्यायालयात हजर करीत 2 दिवसांची वनकोठडी घेण्यात आली.
सदर प्रकरण हे वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने अत्यन्त गंभीर स्वरूपाचे आहे, या प्रकरणी आरोपीची संख्या मोठी असू शकते, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीनी वाघाची शिकार केली का? याबाबत आरोपीची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नायगामकर यांनी दिली.
सदरची यशस्वी कारवाई मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, विभागीय वनाधिकारी निकिता चौरे, सहायक वनसंरक्षक विकास तरसे, मध्य चांदाचे आदेश शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी नायगामकर, क्षेत्र सहायक तिजारे, एचपी डोंगरे, वनरक्षक कविता यादव, कोडापे, बोबाटे, यादव, पारवे व मट्टामी यांनी केली.