Ambedkari Janta on amit shah : अमित शाह राजीनामा द्या, दुर्गापुरात कडकडीत बंद

Ambedkari Janta on amit shah

Ambedkari Janta on amit shah : लोकसभा अधिवेशन दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने देशातील जनतेने शाह यांचा कडाडून विरोध केला.

शाह यांच्या वक्तव्याचे पडसाद चंद्रपुरातील दुर्गापुरात बघायला मिळाले, 28 डिसेंबर रोजी संविधान रक्षण समितीच्या वतीने अमित शाह यांच्या विरोधात निषेध मोर्चा व दुर्गापूर बंद करीत निदर्शने करण्यात आली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले, कायदा दिला मात्र आज देशातील सर्वोच्च पदावर बसलेले नेते मंत्री त्यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करीत आहे, त्या वक्तव्याचा दुर्गापुरातील जनतेने कडाडून विरोध करीत निषेध केला.

वारंवार त्रास देतो म्हणून युवकांनी केली एकाची हत्या

अमित शाह (amit shah) यांनी देशातील जनतेची माफी मागत, आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनात उपस्थित महिला आंदोलनकर्त्यांनी केली.

संविधान रक्षण समितीने पुकारलेल्या बंद मध्ये उर्जानगर व दुर्गापुरातील जनतेने कडकडीत बंद पाडला. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या पासून काढण्यात आलेल्या निषेध मोर्च्यात हजारो नागरिक सहभागी झाले होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!