Railway Flyover Accident |2 महिन्यानंतर बाबुपेठ उड्डाणपुलावर पहिला अपघात

railway flyover accident : अनेक वर्षांच्या मागणीनंतर बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास आले, ऑक्टोबर महिन्यात उड्डाणपुलाचे उदघाटन करण्यात आले मात्र अवघ्या 2 महिन्यात या रेल्वे उड्डाणपुलावर भयावह अपघाताने दोन युवकांना आपला जीव गमवावा लागला.


शहरातील नव्याने वाहतुकीसाठी खुला झालेला प्रसिद्ध आणि वादग्रस्त बाबूपेठ उड्डाण पुलावर दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकीने भीषण अपघात होवून तीन तरूण पुलाखाली कोसळले. यात दोघांचा मृत्यू झाला तर, एक तरूण गंभीर जखमी झाला असून त्याची चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. Babupeth flyover

सदरची घटना शनिवारी दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तर जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आयरन विठ्ठल मेश्राम (१७) रा. माजरी ता. भद्रावती, रवी उर्फ साहिल संजय ढवस (२१) असे मृतकांचे नाव आहे. तर सुयोग सुरेश डांगे चिमूर हा जखमी आहे.

आयरन, साहिल, सुयोग हे तिघे मित्र दुचाकी क्रमांक एमएच ३४ सीएस ८१३८ या मोटारसायकलने बाबूपेठ पुलावरून चंद्रपूर शहराच्या दिशेने येत होते. यादरम्यान त्यांच्या वाहनाला मागून अज्ञात वाहनाने धडक दिली. टक्कर इतकी जोरदार होती की तिन्ही मित्र दुचाकीवरून उडून पुलाखाली पडले. यामध्ये दुचाकीचालक आयरन मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला. Chandrapur news

ही काळजी घ्या, मोबाईल चा स्फोट होणार नाही

रवी उर्फ साहिल संजय ढवस याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सुयोग सुरेश डांगे हा गंभीर जखमी झाला आहे. जखमींला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेनंतर अज्ञात वाहनाने घटनास्थळावरून पळ काढला. शहर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाचा तपास शहर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दोन महिण्यापूर्वी सुरू झालेल्या या नवीन पुलावरचा हा पहिलाच अपघात आहे. या पुलावर सुरक्षिततेच्या दुष्टीकोनातून उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी आता परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!