Big Breaking News
Big Breaking News आधुनिक जगात विविध माध्यमातून गुन्हेगारीचा जन्म होत आहे, तर काही गुन्हेगार चित्रपट व क्राईम स्टोरी बघून गंभीर गुन्हे घडवीत आहे, मात्र याउलट चंद्रपुरात पोलीस खात्यात राहून पोलीस कर्मचाऱ्याने गुन्हेगारीचे धडे अंगिकारले व खात्यात राहून चोरी करणे सुरू केले व त्यानंतर थेट हत्येचा गुन्हा पोलीस कर्मचाऱ्याने केला.
मागील 15 दिवसापासून चिमूर तालुक्यातील बेपत्ता असलेल्या व्यापारी महिलेचा मृतदेह आज 10 डिसेंबर नागपुरातील बेसा येथील निर्जन स्थळी आढळला, या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहुले यांना अटक केली. Chandrapur murder
रस्ते विकासासाठी खासदार धानोरकर यांनी केली निधीची मागणी
देवांश जनरल स्टोर्स च्या संचालिका 37 वर्षीय अरुणा अभय काकडे या 26 नोव्हेंबर रोजी नागपुरातील इतवारी मार्केट मध्ये दुकानातील सामान खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या.
इतवारी भंडारा मार्गावरील बाटा शोरूम समोरून त्या हरवल्या, अरुणा काकडे घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र विचारपूस केली मात्र त्यांचा काही थांगपत्ता लागला नाही. चिमूर पोलीस स्टेशनमध्ये अभय काकडे यांनी मिसिंग तक्रार दाखल केली.
पोलिसांनी शोध मोहीम राबवली मात्र अरुणा काकडे यांचा पत्ता काही लागला नाही.
काकडे या चिमूर व्यापारी संघटनेच्या सदस्या असल्याने जिल्हा व्यापारी मंडळाने पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन दिले.
पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्याकडे सोपविला.
शहर पोलिसांनी पथके तयार करीत तपासाच्या विविध बाजू तपासल्या, शेवट चंद्रपूर पोलिसांच्या पथकाने तांत्रिकदृष्ट्या तपास करीत बेपत्ता अरुणा चा कॉल रेकॉर्ड तपासला असता त्यामध्ये नरेश डाहूले यांचा क्रमांक आढळला, या दरम्यान पोलिसांना अखेर आरोपी गवसला, आरोपी हा बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहूले होता.
पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली, त्याने सांगितले की 26 नोव्हेंबर रोजी अरुणा काकडे मला भेटली होती, अरुणा ही माझी वर्गमैत्रिण होती, त्यामुळे आमची चांगली ओळख होती. त्यादिवशी आम्ही दिवसभर सोबत होतो, त्यानंतर रेशीमबाग मैदानावर आमच्या दोघात वाद झाला, मी यावेळी रागाच्या भरात अरुणा चा गळा आवळून खून केला व त्यानंतर आपल्या चारचाकी वाहनात अरुणा चा मृतदेह टाकत बेसा येथील निर्जन स्थळी असलेल्या घरातील शौचालयाच्या टाक्यात तिचा मृतदेह टाकला व तिथून निघून गेलो. Chandrapur crime news

वर्ष 2023 मध्ये चंद्रपूर शहरातील विविध भागात घरफोडीचे गुन्हे घडले, या गुन्ह्याचा तपास रामनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे करीत होते, त्यांनी घरफोडीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी नरेश डाहूले ला अटक केली. Big breaking news
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक दरम्यान डाहूले व आयपीएल सट्टा मध्ये लाखोंचे कर्ज अंगावर झाल्याने डाहूले यांनी घरफोडी चे गुन्हे करण्यास सुरुवात केली. घरफोडी प्रकरणात आरोपी हा पोलीस कर्मचारी असल्याने चंद्रपूर पोलीस विभागाची चांगलीच बदनामी झाली होती, त्यानंतर नरेश डाहूले ला पोलीस विभागाने बडतर्फ केले होते.
आता पुन्हा वर्षभरानंतर नरेश डाहूले ला हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात अटक केल्याने पुन्हा पोलीस विभागाची चांगलीच नाचक्की झाली आहे.