Chandrapur road accident
Chandrapur road accident : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा ते गोविंदपूर या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे, या मालिकेत 18 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजताच्या दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या बस व दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. बस चालकाला गंभीर दुखापत झाली असून बसमधील 7 ते 8 प्रवासी किरकोळ जखमी झाले.
आज सकाळी किनवट आगाराची बस चंद्रपूर कडे येत होती, या दरम्यान कोरपना – गडचांदूर मार्गावरून जात असताना अचानक समोर दुचाकी आल्याने बस चालकाने दुचाकी चालकाला वाचविण्याचा प्रयत्न केला असता बसचे नियंत्रण सुटले, आणि दुचाकीला धडक देत बस डिव्हाईडर तोडत रस्त्याच्या खाली उतरली.
मुनगंटीवार यांच्या मंत्रीपदासाठी कार्यकर्त्यांची पदयात्रा
या अपघातात दुचाकी चालक गडचांदूर निवासी 45 वर्षीय कान्होजी संन्याशी डायले यांचा मृत्यू झाला. बस मधील 8 ते 10 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून बस चालकाला या अपघातात गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच गडचांदूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, जखमी प्रवासी व बस चालकाला ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.