Bsp District President join congress : चंद्रपूर बसपा जिल्हाध्यक्षाचा कांग्रेस पक्षात प्रवेश

Bsp District President join congress

Bsp district president join congress चंद्रपूर : बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिरीष गोगुलवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम शनिवारी (ता. ७) पार पडला.

रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई


यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. के. सिंग, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी विनोद दत्तात्रय, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, प्रविण काकडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. Big news today

खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे यांनी गोगुलवार आणि सर्व कार्यकर्त्यांचा पक्षाचा दुपट्टा टाकून स्वागत केले.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात बहुजन समाज पक्ष मोठ्या प्रमाणात उतरत्या क्रमात गेला, बसपा सारखा एकेकाळी मोठा पक्ष आज हळूहळू नामशेष होत असल्याचे चित्र आहे.

या कारणामुळे आता पदाधिकारी सुद्धा बहुजन समाज पक्षाला रामराम करीत दुसऱ्या पक्षाचा हात आपल्या हातात घेत आहे. असेच चित्र आता चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात दिसले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!