Bullet raja : चंद्रपुरातील ‘बुलेट राजांची” आता खैर नाही

Bullet raja

Bullet raja : चंद्रपुरातील वाहतूक नियंत्रण शाखेने कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेदरम्यान वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 8 दुचाकी वाहनावर कारवाई केली.

बीड जिल्ह्यात जी घटना घडली, ती पुन्हा भविष्यात – सुधीर मुनगंटीवार

वाहतूक पोलिसांची चंद्रपूर जिल्ह्यात नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर कारवाई मोहीम हाती घेतली आहे, 29 डिसेंबर रोजी चंद्रपूर शहरात पोलिसांच्या कारवाईत drunk एन्ड ड्राइव, ट्रिपल सीट व दुचाकी वाहनांचे मोडीफिकेशन यांचा समावेश होता, शहरातील युवक आपल्या वाहनात बदल करीत सायलेन्सर व कर्णकर्कश हॉर्न लावत वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात यावर आळा बसावा यासाठी पोलिसांनी शहरात कारवाई सत्र राबविले. (Chandrapur traffic police)


जप्त करण्यात आलेल्या दुचाकी वाहनांचे सायलेन्सर काढण्यात आले असून चालकांना मेमो दिला आहे, सोबतच आपण वाहनात असा बदल का केला याबाबत परिवहन अधिकाऱ्याला स्पष्टीकरण द्यायचे आहे.

जप्त करण्यात आलेल्या दुचाकी वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी दिली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!