Burglary theft
Burglary theft : चंद्रपूर शहरात सध्या अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून घरातील दागिने, दुचाकी चोरी जाण्याच्या घटना घडत आहेत. अश्यातच शहरातील बाबुपेठ येथील डी एड कॉलेजच्या मागे राहणारे गौतम जीवने हे आज 22 डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास बाहेर फिरण्यासाठी गेले होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या साहित्य खरेदीसाठी 100 कोटींचा निधी द्या – आमदार जोरगेवार
घरी कुणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने दरवाज्याचे कुलूप तोडत घरात प्रवेश केला, घरातील कपाट फोडत चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख 15 हजार असा एकूण 50 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
गौतम जीवने हे घरी परत आल्यावर घरातील सामान अस्तव्यस्त अवस्थेत आढळले असता त्यांनी कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याचे समजताच त्यांनी जीवने यांनी चंद्रपूर शहर पोलिसात (city police station) माहिती देत गुन्हा नोंद केला.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पंचनामा केला. गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही कॅमेरे तपासून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.