Cattle smuggling case | चंद्रपुरात गोवंश जनावरांची तस्करी, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Cattle smuggling case

Cattle smuggling case : तेलंगणा राज्याला लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातून गोवंश तस्करी मोठया प्रमाणात होत असते, यासाठी तस्करी छुपा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात असतात मात्र अनेकदा हे तस्कर पोलिसांच्या जाळ्यात अडकतात.

अशीच एक मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने (crime branch) केली आहे, कत्तलीसाठी नेत असताना गुन्हे शाखेने 45 गोवंशीय जनावरे ताब्यात घेत प्यार फाउंडेशन मध्ये दाखल केले.

चंद्रपूर शहर पोलिसांनी जल्लाद ला केली अटक

23 डिसेंम्बर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत होते, यादरम्यान कत्तलीसाठी गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली.

माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धानोरा फाटा घुग्गुस येथे नाकाबंदी केली, त्यादरम्यान ट्रक क्रमांक CG24 S 2672 ला थांबवित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 45 गोवंश जनावरांचे पाय बांधलेल्या अवस्थेत आढळले.

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

पोलिसांनी ट्रक व 45 गोवंश जनावरे असा एकूण 19 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, याप्रकरणी 2 आरोपीना ताब्यात घेत त्यांना (chandrapur police) घुग्गुस पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन अधिकारी SDPO चौगुले, API कांक्रेडवार, PSI सामलवार, पोहवा महात्मे, जयंता, चेतन, पो.अं. वकाटे, सावे व पोहवा दिनेश यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!