cdcc bank exam : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेत उत्तरात झाला बदल आणि..

cdcc bank exam

cdcc bank exam : सहकार क्षेत्रातील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदभरती परीक्षेत आज सकाळी चांगलाच गोंधळ उडाला, परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर धरणे आंदोलन करीत मध्यवर्ती बँकेचा निषेध केला.
अखेर मुंबई आयटीआय कंपनीने आजचा पेपर रद्द करीत उमेदवारांना पुढची तारीख मेल व मोबाईल द्वारे कळविण्यात येणार असे सांगितले.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत 358 पदांची पदभरती निघाली होती, यामध्ये लिपिक 261 व शिपाई पदासाठी 97 जागा निघाल्या, या पदभरती प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. (Cdcc bank recruitment 2024)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विरोधात युवासेनेचे आंदोलन


358 पदासाठी राज्यभरातून तब्बल 31 हजार उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केला, 21 ते 23 डिसेंबर या कालावधीत सदर परीक्षा राज्यातील विविध केंद्रावर घेण्यात येणार होत्या मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी चंद्रपुरातील आंबेडकर कॉलेज केंद्रावर चांगलाच गोंधळ झाला.
पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळाने उत्तर सेव्ह करीत असताना निवडलेल्या पर्यायात बदल व्हायला लागला.
याबाबत उमेदवारांनी केंद्रावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सदर प्रकार सांगितला काही वेळाने सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झाला असल्याचे कारण समोर करीत परीक्षा रद्द केली.

बँकेच्या परीक्षेत घोळ, आमदार जोरगेवार संतापले

विशेष बाब म्हणजे चंद्रपुरात या पदभरती परीक्षेचा पेपर देण्यासाठी नांदेड, पुणे, छत्रपती संभाजी नगर, अकोला या जिल्ह्यातील उमेदवार आले होते परीक्षा रद्द झाल्याने उमेदवारांनी संताप व्यक्त करीत (cdcc bank chandrapur) चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.


ही परीक्षा आधीच सेट केली आहे असा आरोप उपस्थित उमेदवारांनी केला. आम्ही 700 किलोमीटर चे अंतर कापून परीक्षेत सहभागी झालो मात्र पेपर सुरू झाल्यानंतर अचानक हा गोंधळ झाल्याने आम्हाला मानसिक व आर्थिक त्रास झाला, करीता आता आम्हाला स्थानिक जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात यावे अशी मागणी उमेदवारांनी केली.

बँक प्रशासन म्हणते, ती जबाबदारी आमची नाही


चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी आपले हात झटकत आमचा करार मुंबई आयटीआय कंपनी सोबत झाला असून ही सर्व जबाबदारी आहे, यामध्ये बँक प्रशासन जबाबदार नाही अशी प्रतिक्रिया कल्याणकर यांनी दिली.

आमदार जोरगेवार यांचे गंभीर आरोप

नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षा केंद्रावर झालेल्या गोंधळाबाबत मुद्दा उपस्थित केला, ते म्हणाले की या भरती प्रक्रियेत एका जागेचा दर हा 40 लाख रुपये असून यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहे, राज्यात 9 जिल्ह्यामध्ये ही ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे.

आज झालेल्या गोंधळामुळे ही परीक्षा रद्द केली मात्र बाहेर आलेल्या उमेदवारांना याचा आर्थिक भुर्दंड बसला असून सदर परीक्षा आता पारदर्शक पध्दतीने घेण्यात याव्या व उमेदवारांना स्थानिक जिल्ह्यातील परीक्षा केंद्र देण्यात यावे अशी मागणी अधिवेशनात आमदार जोरगेवार यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!