Chandrapur City | चंद्रपूर शहरातील या भागात दुचाकी चोरी, पोलिसांनी लावला छडा

chandrapur city

chandrapur city : चंद्रपूर शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ होत आहे, घडणाऱ्या या गुन्हेगारीवर आळा व कारवाई करण्यास चंद्रपूर पोलीसही मागे नाही.

शहरातील झाडे हॉस्पिटल ते पंचशील चौक या मार्गावर 38 वर्षीय मंजुल जैन यांनी आपली दुचाकी क्रमांक एमएच 34 सिके 3210 ही हँडल लॉक करीत ठेवली होती.

15 डिसेंम्बर ला सदर दुचाकी वाहन हे त्याठिकाणी आढळून आले नाही, मंजुल ने आपल्या दुचाकी वाहनाचा इतरत्र शोध घेतला मात्र वाहन कुठेही आढळून आले नसल्याने मंजुल यांनी शहर पोलीस (chandrapur city police) स्टेशनमध्ये दुचाकी चोरी बाबत फिर्याद नोंदवली.

चंद्रपूर शहर पोलिसांनी (chandrapur police) गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला, झाडे हॉस्पिटल ते पंचशील चौक या मार्गावर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, गुन्हे शोध पथकाने या गुन्ह्यात कौशल्यपूर्ण तपास करीत मुखबिर द्वारे माहिती घेत आरोपीचा शोध घेतला.

सिस्टर कॉलोनी बिनबा गेटजवळ राहणारा 23 वर्षीय शाकिर नबी शेख या युवकाला पोलिसांनी अटक केली, चोरी गेलेल्या दुचाकी बाबत पोलिसांनी विचारणा केली असता सदर दुचाकी आपण चोरली असल्याची कबुली शाकिर ने पोलिसांजवळ दिली.

विविध मागण्यांसाठी शिक्षक संघाचे धरणे आंदोलन

पोलिसांनी अधिक विचारपूस करीत आरोपीच्या घराजवळ झडती घेतली असता पोलिसांना पुन्हा एक दुचाकी आरोपी जवळून जप्त करण्यात आली. चंद्रपूर शहर पोलिसांनी आरोपी शाकिर जवळून 2 दुचाकी सहित एकूण 1 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची यशस्वी कार्यवाही पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. प्रभावती एकुरके चंद्रपुर शहर, पो.उप.नि. संदिप बच्छीरे, कपुरचंद खरवार, सचिन बोरकर, संतोष कनकम, भावना रामटेके, इम्रान खान, दिलीप कुसराम, ईरशाद खान, रूपेश रणदिवे, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम यांनी केली आहे. पुढील तपास म.पो.हवा. भावना रामटेके हे करित आहेत.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!