Coal Mine Tourism | भूमिगत कोळसा खाणीत पर्यटन सुरू होणार

Coal Mine Tourism

Coal Mine Tourism : चंद्रपूर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. येथे वन पर्यटनासह धार्मिक आणि औद्योगिक पर्यटन सुरू करण्यावर त्यांचा भर आहे. आज त्यांनी वेकोलीच्या सिएमडी कार्यालयात बैठक घेतली आणि वेकोलीच्या भूमिगत खाणी पर्यटनासाठी खुल्या करण्याची मागणी सीएमडी जयप्रकाश द्विवेदी यांच्याकडे केली आहे.

चंद्रपूर पोलिसांचे ऑपरेशन मुस्कान

आमदार किशोर जोरगेवार (kishor jorgewar news) यांनी नागपूर येथील वेकोलीच्या  सीएमडी कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली. याप्रसंगी हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवकुमार यादव यांची उपस्थिती होती.

उत्तर अचूक पण संगणकाने चुकविलं, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेत गोंधळ

  चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असून येथे अनेक उद्योग आहेत. त्यामुळे औद्योगिक पर्यटनाच्या माध्यमातून या जिल्ह्याला पर्यटनाचे हब तयार करता येईल. यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. ताडोबा अभयारण्य येथे येणारा पर्यटक केवळ ताडोबा पाहून परत न जाता, त्या पर्यटकांनी येथील इतर ऐतिहासिक वास्तू, उद्योग आणि प्राचीन धार्मिक स्थळांना भेट द्यावी, यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होऊन नागरिकांचे जीवनमान उंचावेल, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

 दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी भूमिगत खाणी पर्यटनासाठी खुल्या करण्याची मागणी  सीएमडी जयप्रकाश द्विवेदी यांच्याकडे केली. याबाबत  सीएमडी यांनी सकारात्मकता दर्शवली असून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

  याशिवाय, आमदार किशोर जोरगेवार यांनी वेकोलीने सीएसआर फंडातून दोन गार्डनची निर्मिती करावी, माना येथील जलाशयात बोटींग पर्यटन सुरू करावे, तुकूम आणि लालपेठ येथे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून निधी द्यावा, लालपेठ आणि रयतवारी कॉलरी येथे दोन सामाजिक भवनांची निर्मिती करावी, ग्रामीण भागात वॉटर एटीएम मशीन्स बसवाव्यात अशी मागणीही केली. या सर्व मागण्यांवर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच निर्णय घेतले जातील, असे   सीएमडी  जयप्रकाश द्विवेदी यांनी म्हटले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!