chandrapur drishyam
Chandrapur drishyam बॉलीवूड क्षेत्रातील नावाजलेला अभिनेता अजय देवगण यांचा दृश्यम चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता, दृश्यम चित्रपटाला लाजवेल असा गुन्हा चंद्रपूर जिल्ह्यातील बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने केल्याने एकच खळबळ उडाली.
चिमूर येथील नूतन आदर्श कॉलोनी मध्ये राहणाऱ्या 37 वर्षीय अरुणा काकडे यांचा गळा आवळून खून करीत अरुणा चा मृतदेह बेलतरोडी मार्गावरील वेळाहरी गावाजवळ असलेल्या जंगलात गेला आणि एका शौचालयाच्या टाकीत मृतदेह पुरला.
15 दिवसापासून बेपत्ता असलेल्या महिलेचा खून
ही भयावह घटना घडली 26 नोव्हेंबर रोजी, अरुणा यांचं चिमूर मध्ये देवांश जनरल स्टोर्स चे दुकान आहे, त्या अधूनमधून दुकानाचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागपूरला येजा करीत होत्या. Chandrapur news today
घटनेतील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहूले हा अरुणा चा वर्गमित्र व नातेवाईक, हा 26 नोव्हेंबर रोजी नागपुरात अरुणा ला भेटला, मात्र काही वेळाने दोघात वाद झाला आणि नरेश ने अरुणा चा गळा आवळून खून केला. अरुणा चा खून का केला? कारण काय? याबाबत अजूनही आरोपीने स्पष्टपणे माहिती पोलिसांना दिलेली नाही.
अशी घडली घटना..
26 नोव्हेंबर रोजी अरुणा नागपुरात आल्या होत्या, तिथे पोहचल्यावर अरुणा ने पती ला मोबाईल द्वारे पोहचली असल्याचा कॉल केला, सायंकाळच्या सुमारास अरुणा चा मोबाईल बंद होता.
रात्र झाल्याने अरुणा घरी आली नाही, पती अभय काकडे यांनी इतरत्र शोधाशोध केली.
मात्र अरुणा यांचा काही पत्ता लागला नाही. याबाबत मिसिंग रिपोर्टची चिमूर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली. Chandrapur news today
थांगलान चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित
बेपत्ता असल्याच्या 15 दिवसांनी अरुणा चा मृतदेह मिळाला, काय झालं? कुणी अरुणा ला मारलं? याबाबत शंका व चर्चा रंगू लागल्या.
असा लागला शोध….
अरुणा कुठे गेली? याबाबत स्थानिक गुन्हे शाखा तपास करीत होती, काही दिवसांनी अचानक अरुणा चा मोबाईल ऑन झाला, गुन्हे शाखेला लोकेशन मिळताच ते पोहचले बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहूले कडे, गुन्हे शाखेने त्याला मोबाईल बाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
तो पोलिसांना प्रतिसाद देत नव्हता, मात्र त्याचवेळी गुन्हे शाखेची नजर बाजूला असलेल्या दुचाकीवर गेली, सदर दुचाकी वाहन हे चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले.
वर्ष 2023 मध्ये चंद्रपूर शहरातील चांडक मेडिकल स्टोर्स जवळून दुचाकी वाहन चोरी झाले होते. Chandrapur drishyam
डाहूले जवळ मिळालेले दुचाकी वाहन हे त्या गुन्ह्यातील होते, नरेश डाहूले ला चंद्रपुरात आणण्यात आले, अरुणा बाबत त्याला विचारणा केली मात्र तो काही प्रतिसाद व उत्तर देत नव्हता.
त्यानंतर चंद्रपूर शहर पोलिसांनी डाहूले ला वाहन चोरी प्रकरणी अटक केली, मात्र यावेळी अरुणा बाबत त्याने शहर पोलिसांना माहिती दिली आणि घटनेचा उलगडा झाला.
आरोपी नरेश डाहूले यांनी 26 नोव्हेंबर रोजी झुमकार एप्प द्वारे चारचाकी वाहन भाड्याने घेतले, त्यानंतर दोघे रेशीमबाग मैदानजवळ गेले, त्याठिकाणी दोघांचा वाद झाला, नरेश ने अरुणा चा वाहनात ओढणीने गळा आवळत खून केला, आणि त्यानंतर त्याने शौचालयाच्या टाक्यात दगड, माती व प्लास्टिक द्वारे मृतदेहाची विल्हेवाट लावली. Chandrapur drishyam
कोण आहे नरेश डाहूले?
वर्ष 2014 मध्ये चंद्रपूर पोलीस दलात डाहूले रुजू झाले, त्यांनी जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये सेवा दिली, वर्ष 2023 मध्ये स्थानिक गुन्हे शाखेत डाहूले कार्यरत होते.
या काळात चंद्रपूर शहरात अनेक घरफोडीच्या घटना घडल्या होत्या, रामनगर पोलिसांनी या गुन्ह्यात पोलीस कर्मचारी नरेश डाहूले ला अटक केली, आणि त्यानंतर पोलीस दलाने त्याला सेवेतून बडतर्फ केले.
डाहूले हल्ली नागपुरात वास्तव्यास होता, फूड डिलिव्हरी कंपनीत तो डिलिव्हरी बॉय चे काम करीत असल्याची माहिती आहे, त्याठिकाणी सुद्धा काही गुन्ह्यात त्याचा सहभाग असू शकतो, अशी शक्यता आहे. Chandrapur news today
पोलीस विभागात राहून गुन्हेगारी काय आहे? त्यातून सुटका कशी करता येते याबाबत त्याला चांगलीच जाणीव होती.
मात्र त्याला शेअर बाजार व क्रिकेट सट्टा चे व्यसन लागले आणि तो लाखोंचे कर्ज अंगावर घेत त्या ओझ्याखाली दाबला गेला.
या ओझ्यातून स्वतःची सुटका करण्यासाठी त्याने गुन्हेगारी क्षेत्रात उडी घेतली आणि हळूहळू त्याने पोलीस च्या वेशात चोराची भूमिका चांगलीच बजावने सुरू केले.
विशेष बाब म्हणजे अरुणाची हत्या अपहरण आहे ही सिद्ध करण्यासाठी आरोपीने नरेश ने त्या काळात 2 ते 3 ठिकाणी अरुणा चा मोबाईल ऑन केला होता, जेणेकरून अरुणा चे कुणीतरी अपहरण केले हे पोलीस तपासात आले असते, आणि तपास भरकटला असता.
अरुणा काकडे प्रकरणी चिमूर पोलीस स्थानिक गुन्हे शाखा व चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके व गुन्हे शोध पथकाने चांगली कामगिरी केली.
11 डिसेंबर रोजी अरुणा काकडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी शहरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहूले याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.