chandrapur on amit shah
chandrapur on amit shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद चंद्रपूर शहरात बघायला मिळाले.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांबाबत क्रेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात वातावरण तापलं आहे. दिल्लीतील हिवाळी अधिवेशनात अमित शहांविरोधात विरोधकांनी रान उठवल्याचं दिसल्यानंतर राज्यभर या वक्तव्यावरून वातावरण तापलं असून ठिकठिकाणी आक्रमकपणे या वक्तव्याचा विरोध करण्यात येतोय.
चंद्रपुरात दुचाकी चोरी, पोलिसांनी लावला छडा
आज शुक्रवारी चंद्रपूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अमित शहा यांच्या विरोधात आंबेडकरी समाज संघटना संयुक्त समितीतर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. अमित शहा यांच्या प्रतिमेला आंबेडकरी जनतेने चपला मारत आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात करीत अमित शाह यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. Amit shah ambedkar controversy
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर चंद्रपुरात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
यावेळी प्रविण खोब्रागडे,रोहिदास राऊत,बंडू नगराळे, प्रतीक डोर्लीकर,सुरेश नारनवरे, राजस खोब्रागडे,अशोक फुलझेले,निर्मला नगराळे,गीता रामटेके, पंचफुला वेल्हेकर,प्रेरणा करमरकर,ज्योती रंगारी, वर्षा घडसे,अंजली नीमगडे,निर्मला पाटील,संघमित्रा खोब्रागडे,अंकुश वाघमारे,केशव रामटेके,हरिदास देवगडे,हर्षल खोब्रागडे, भय्या मानकर,नामदेव पिंपळे,अंकुश वाघमारे सुरेंद्र रायपूरे,राजकुमार जवादे,अवरसिंह गोथरा,पप्पू देशमुख, अनिल डहाके,रवींद्र मोटघरे,किशोर सवाने,अझहर शेख,इरफान शेख,बुद्धप्रकाश वाघमारे,किशोर तेलतुमडे दिलीप वावरे,राजेश वणकर,राजू किर्तक,आनंद शेंडे, सचिन पाटील व अशोक सागोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.