chandrapur property tax online payment : मालमत्ता करात मिळणार 5 टक्के सूट, पण….

chandrapur property tax online payment

chandrapur property tax online payment नियमित मालमत्ता कर भरणा करणाऱ्यांकरीता प्रोत्साहन म्हणुन 31 डिसेंबरपर्यंत मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी 4 टक्के सूट तसेच ऑनलाईन पद्धतीने कराचा एकमुस्त भरणा करणाऱ्यांना 5 टक्के सुट देण्याचे मनपातर्फे जाहीर करण्यात आले आहे.        
    मालमत्ता कर हे मनपाच्या उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. शहरासाठी नियमित सोयी सुविधा पुरविण्यास मालमत्ता कराची अधिकाधिक वसुली होणे गरजेचे आहे. महापालिका क्षेत्रात जवळपास 80 हजार मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे मागणी नोंदवली जाते. Cmc chandrapur property tax

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, चंद्रपुरात जल्लोष

करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करणे ही कर विभागाची पहिली प्रक्रिया मानली जाते. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने करवसुलीस प्राधान्य दिले जाते.  


     करभरणा हा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन अथवा https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येणे शक्य आहे.  ऑनलाइन युपीआय ॲप अर्थात फोन पे, गुगल पे,भीम ॲप ( भारत इंटरफेस फॉर मनी ) यांचाही पर्याय मनपाने उपलब्ध करून दिलेला आहे.

तसेच व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर करून सुद्धा मालमत्ता कर भरता येणार असुन याकरिता 8530006063 या क्रमांकावर वर “hi” टाईप करून आलेल्या उत्तरात ४ था क्रमांकाचा पर्याय निवडुन कर भरता येईल.  

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!