yuva sena on amit shah
yuva sena on amit shah : चंद्रपूर – लोकसभा हिवाळी अधिवेशनदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले, यानंतर त्या वक्तव्याचे देशात पडसाद उमटले.
विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निषेध करीत त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करीत सभात्याग केला.
जिल्हा बँकेची पदभरती, अधिवेशनात आमदार जोरगेवार संतापले
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान अमित शाह (amit shah controversy) यांनी आपल्या वक्तव्यातून केल्याने आज 21 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर चंद्रपूर जिल्हा युवासेनेतर्फे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात अमित शाह यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आले.
संविधानाचे जनक महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान देशवासी खपवून घेणार नाही, बाबासाहेब यांच्या संविधानामुळे आज नागरिकांना समान अधिकार मिळाला आहे, आज देशातील सर्वोच्च सभागृहात जाण्याचा मान बाबासाहेब यांच्यामुळे मिळाला आणि तुम्ही जगाच्या महामानवाचा आपण अश्या शब्दात अपमान करता हे अतिशय निंदनीय बाब आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तात्काळ देशातील जनतेची जाहीर माफी मागावी अन्यथा या आंदोलनाचे पडसाद भविष्यात बघायला मिळणार असा इशारा व प्रतिक्रिया युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी दिली.
निदर्शने आंदोलनात.माजी जिल्हा महिला संघटिका कुसुम उदार, जिल्हा समन्वयक विनय धोबे,बाळू भगत, प्रदीप गेडाम, सुजित पेंदोर, तालुका प्रमुख सूरज शेंडे,शहरप्रमुख शहबाज शेख, उप तालुकाप्रमुख विवान रामटेके, उपशहरप्रमुख स्वप्निल पाटील, तालुका समन्वयक प्रज्वल आवळे,शहर प्रमुख महेश श्रीगिरवार ,सागर धनसकार, सागर गभाणे,सागर रायपुरे, विशाल पाटील, अभिजित वाघाडे,पृथ्वी ठाकूर, धम्मादीप खोब्रागडे, सलमान शेख, राहुल पाटील, शाहरुख शेख यांची उपस्थिती होती.