Crop insurance scheme | पीक विम्याच्या मुद्द्यावर खासदार धानोरकर आक्रमक

Crop insurance scheme

Crop insurance scheme : दिल्ली येथे लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असून विविध प्रश्नांच्या माध्यमातून खासदार प्रतिभा धानोरकर ह्या सरकार चे लक्ष वेधून घेत आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान सन 2023 ची प्रधानमंत्री पिक विम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचे सरकार च्या लक्षात आणून दिले.

आमदार जोरगेवार यांच्या वाढदिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन

खासदार प्रतिभा धानोरकर (mp pratibha dhanorkar) यांनी दिल्ली येथे लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात विविध विषयाच्या अनुषंगाने सरकार ला धारेवर धरले असून कृषी व शेतकरी विषयाच्या संदर्भात त्यांनी आक्रमकपणे आपले प्रश्न मांडले आहेत.

किटकनाशकांमुळे अनेक शेतकऱ्यांचे व त्यांच्या पाल्यांचे मृत्यु होत असल्याचे सरकार च्या निर्दशनास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आणून दिले. तसेच किटकनाशकामुळे होणारे दुष्परीणामांसाठी सरकार ने उपाययोजना कराव्यात. त्यासोबतच अशा प्रकरणात दवाखान्यांना देखील आवश्यक सूचना द्याव्यात या संदर्भात खासदार धानोरकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

मी नाराज नाही – सुधीर मुनगंटीवार

त्यासोबतच 2023 मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पिक विम्याचे पैसे अद्यापही मिळाले नसल्याचे सभागृहात खासदार धानोरकर यांनी सांगितले. संबंधीत पिक विम्याचे पैसे तात्काळ देण्यात यावे व संबंधीत कंपनीवर कार्यवाही करावी अशी मागणी देखील खासदार धानोरकर यांनी सभागृहात केली. संबंधीत कंपनीची मुजोरी या सरकार ने बंद करावी व शेतकाऱ्यांना न्याय द्याव, अशी देखील विनंती सरकार कडे केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!